जनावरांचे कुजलेले अवशेष आणि घाण पाणी प्रवरा नदी पात्रात
दोघाजणांविरुद्ध गुन्हा दाखल
संगमनेर प्रतिनिधी दि. 4
संगमनेर शहरातील फादरवाडी मागील प्रवरा नदी लगत कुजलेले जनावरांचे मांस साठवून बेकायदेशीर रित्या उरलेले जनावरांचे मांस आठवले आणि त्याचे काही अंश आणि घाण पाणी प्रवरा नदीत सोडल्याच्या कारणावरून संगमनेर शहर पोलिसांनी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सुभाष गुलाब मेहेत्रे व अविनाश सुभाष मेहत्रे (दोघे राहणार सेंट मेरी शाळा पाठीमागे, जोर्वे रोड, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर) अशी गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नावे आहेत.

वरील आरोपींनी सार्वजनिक आरोग्यास बाधा निर्माण होणार नाही याबाबत आदेश पारित केलेले असताना देखील त्यांच्या मालकीच्या सर्व्हे नंबर 192 193 मध्ये खड्डे घेऊन घेतलेल्या त्या खड्ड्यांमध्ये मेलेल्या जनावरांचे अनावश्यक कुजलेले मांस टाकले. तसेच त्यापैकी काही अवशेष व त्याचे घाण पाणी प्रवरा नदीच्या पात्रात जाऊन नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यास दूषित करून सदर भागातील मानवी आरोग्य धोक्यात येईल अशी कृती केली आहे.

त्यामुळे या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या संदर्भात पोलीस कॉन्स्टेबल विशाल रामदास कर्पे यांनी फिर्याद दिली आहे. दि. 28 फेब्रुवारी रोजी नगरपालिकेने पोलिसांना या सर्व प्रकाराबाबत पत्र देऊन कारवाई करण्याची विनंती केली होती. त्यानुसार सदरील कारवाई करण्यात आली आहे.
