गरजवंतांना मिळणार घरकुलाचा लाभ — आमदार खताळ
पंचायत समितीत लाभार्थ्यांना घरकुल प्रमाणपत्र वाटप
संगमनेर प्रतिनिधी दि.23
संगमनेर तालुक्यात घरकुल वाटपात येथून मागे राजकारण झाले होते.परंतु येथून पुढे घरकुल वाटपाचे काम अत्यंत पारदर्शी पणे केले जाईल. ज्याला खऱ्या अर्थाने घरकुलाची गरज आहे. आशा गरजवंत लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ दिला जाईल असे प्रतिपादन आमदार अमोल खताळ यांनी केले आहे.

संगमनेर पंचायत समिती सभागृहात तालुक्यातील ७ हजार १४५ लाभार्थ्यांना घरकुल लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर पहिला हप्ता ऑनलाइन जमा करण्यात आला असल्याचे प्रमाणपत्र लाभार्थ्यांना खताळ यांच्या हस्ते देण्यात आले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावरसंगमनेर पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी राजेंद्र ठाकूर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप रोहिदास गुंजाळ, गणेश गुंजाळ, लघुपाटबंधारे विभाग उप अभियंता हितेंद्र गव्हाळे, कृषीअधिकारी वाळीबा उघडे व रामराव कडलग, विस्तार अधिकारी मदन शेवाळे, राजेंद्र कासार, काशिनाथ सरोदे, सदानंद डोखे, भाग्यश्री शेळके आदी उपस्थित होते.

आमदार खताळ म्हणाले की, देशातील सर्वांना हक्काचे घर मिळाले पाहिजे अशी संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आहे. परंतु यापूर्वीच्या काळात येथून मागे मंजूर झालेल्या घरकुलांचे कामे पूर्ण करण्यात अनेक अडचणी आल्या होत्या. परंतु आता येथून पुढील काळात घरकुले तयार करताना कुठली अडचण येणार नाही याची मी काळजी घेईल. असा विश्वास खताळ यांनी दिला. घरकुलाचे बांधकाम करताना वाळू मिळण्यास लाभार्थींना अनेक अडचणी आल्या होत्या, परंतु आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घरकुलाच्या बांधकामा साठी वाळू मोफत देण्याचे धोरण जाहीर केले आहे. त्यामुळे घरकुलांना मोफत वाळू उपलब्ध करून द्यावी अशी सूचना आपण प्रांतांधिकारी आणि तहसीलदार देत असल्याचे आमदार खताळ यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक व स्वागत प्रभारी गटविकास अधिकारी राजेंद्र ठाकूर यांनी केले. तर सूत्रसंचालन कक्ष अधिकारी राजेश तिटमे यांनी करून उपस्थितांचे आभार मानले.

