नाशिक – पुणे औद्योगिक महामार्गाचे काम लवकरात लवकर तडीस न्यावे

संगमनेर शहरासाठी इंटरचेंज प्रस्तावित करण्यात यावा…

 सत्यजित तांबे यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे मागणी

संगमनेर दि. 9

नाशिक पुणे औद्योगिक महामार्गासह या महामार्गाबाबत आमदार सत्यजित तांदळे घराणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे विविध मागण्या केल्या आहेत. शिंदे यांची भेट घेऊन तांबे यांनी त्यांना मागण्यांचे निवेदन दिले.

तसेच संगमनेर शहर व तालुक्याचे निगडित विविध विकास कामांच्या बाबत आणि रखडलेल्या कामाबाबत उपमुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिंदे यांच्याकडे त्यांनी मागण्या केल्या आहेत.

मुख्यमंत्री शिंदे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संगमनेर शहरातील अतिक्रमणीत झोपडपट्टी भागात व भाड्याच्या घरात राहणाऱ्या 2,500 कुटुंबांना हक्काचं स्वमालकीचे घर मिळावे यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत राज्य व केंद्र शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ करावी.

संगमनेर रस्ते विकास प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देऊन महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत प्रकल्पाच्या प्रस्तावित रकमेस मंजुरी द्यावी आणि शहराच्या विविध भागातील रस्त्यांच्या दुरुस्ती व देखभालीसाठी अनुदान उपलब्ध करून द्यावे.

संगमनेर शहरातील सर्वच निवासी अनधिकृत बांधकामांवरील 100% शास्तीकर माफ करून ही सर्व अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्यासाठी ठोस योजना आणावी.

संगमनेर शहराचं नाव ज्या 3 नद्यांच्या संगम ठिकाणावरून पडले, त्या म्हाळुंगी, आढळा आणि प्रवरा या नद्यांच्या सुधार प्रकल्पासाठी संगमनेर नगरपालिकेने तयार केलेल्या 350 कोटींच्या प्रस्तावास मान्यता द्यावी.

हिवाळी अधिवेशनात हे मुद्दे उपस्थित करून शासनाचे मी याकडे लक्ष वेधले होते, या प्रमुख मागण्यांसह राज्यातील जनतेच्या हिताच्या इतरही प्रश्नांसंदर्भात सविस्तर चर्चा केली. माझ्या सर्व मागण्या ऐकून घेत याविषयी सकारात्मक पावलं उचलली जातील, असा विश्वास त्यांनी दिला असल्याचे तांबे यांनी म्हटले आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!