उत्तर महाराष्ट्रातील युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी टाटा स्ट्रीवशी सामंजस्य करार 

आमदार सत्यजित तांबे यांची माहिती 

नाशिक धुळे जळगाव नंदुरबार आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील युवकांना मिळणार मोठा लाभ…

विशेष प्रतिनिधी दि. 10

उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, धुळे, जळगाव आणि नंदुरबार या 5 जिल्ह्यात आपण YounnovationCentre उभारत आहोत. अशी माहिती आमदार सत्यजित तांबे यांच्याकडून मिळाली आहे.

युवकांना Skillfull करण्यासाठी मोठं योगदान देणाऱ्या “Tata Strive” सोबत आपला #MOU (Memorandum of Understanding) अर्थातच सामंजस्य करार संपन्न झाला. ही बातमी आपल्या सर्वांसोबत शेअर करताना मनापासून आनंद होतोय असे त्यांनी म्हटले आहे.

Tata STRIVE च्या माध्यमातून देशातील हजारो तरुणांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिले आहे. त्यांच्यासोबत झालेला करार उत्तर महाराष्ट्रातील तरुणाईसाठी कौशल्य विकासाचे द्वार खुले करणारा ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

मी महाराष्ट्राला महान राष्ट्र बघू इच्छिणारा एक युवक आहे. महाराष्ट्राला महान राष्ट्र घडवण्याची क्षमता आपल्या युवकांमध्ये नक्कीच आहे, गरज आहे. त्यांना कौशल्यपूर्ण करण्यासाठी एक व्यासपीठ निर्माण करण्याची आणि YounnovationCentre हे ते व्यासपीठ बनेल, याचा मला ठाम विश्वास आहे असा दावा ही त्यांनी केला.

युवकांच्या सर्वांगीन विकासासाठी YounnovationCentre खालील 4 विषयांवर काम करणार आहे.

👉 Education (शिक्षण)

👉 Employment (रोजगार )

👉 Entrepreneurship (व्यवसाय)

👉 Essential for livelihood (आरोग्य, राजकीय, आर्थिक साक्षरता इ. विषय )

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!