भंडारदरा धरणाच्या शतकपूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने या पर्यटन स्थळाच्या सर्व प्रकल्पांना चालना द्यावी —

आमदार सत्यजित तांबे यांची पर्यटनमंत्र्यांकडे मागणी 

विशेष प्रतिनिधी दि. 7 

भंडारदरा धरणाला 2026 साली शंभर वर्षे पूर्ण होत असल्याने या धरण परिसरात पर्यटन स्थळांना चालना देऊन त्यांच्या विकासाचा एक आराखडा तयार करावा अशी मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी तत्कालीन पर्यटन मंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. आता पुन्हा या प्रकरणाला चालना मिळाली असून पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी पुढील कार्यवाही करण्याची ग्वाही आमदार तांबे यांना दिली आहे.


या संदर्भाने आमदार सत्तेचे तांबे यांनी शौचालय खालील प्रमाणे पोस्ट प्रसिद्ध केली आहे…

अहिल्यानगर जिल्ह्यामधील ऐतिहासिक भंडारदरा धरणाला 2026 साली शंभर वर्षे पूर्ण होत आहेत.

त्यानिमित्ताने भंडारदरा या पर्यटन स्थळाचा विकास आराखडा तयार करावा, अशी मागणी मी तत्कालीन जलसंपदा मंत्री व विद्यमान मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे केली होती. आपल्या मागणीनुसार जलसंपदा व पर्यटन विभागाने एक सामंजस्य करार केला होता.


2027 साली नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या धर्तीवर भंडारदरा धरणाचा एक पर्यटन स्थळ म्हणून विकास होण्याच्या दृष्टीने या कराराची तातडीने अंमलबजावणी होऊन तिथे विविध प्रकारचे उपक्रम राबवले जावे यासह तिथे देशातील पहिले वॉटर म्युझियम व्हावे, यासाठी माझे प्रयत्न सुरु आहेत. माझ्या या प्रयत्नांना तत्कालीन पर्यटन मंत्री मा. गिरीश भाऊ महाजन यांनी ताकदीने साथ देऊन यासंबंधी सकारात्मक पावले उचलली होती.

आता नव्याने पर्यटन मंत्री म्हणून शंभूराजे देसाई साहेबांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांची आज भेट घेऊन भंडारदरा धरणाच्या शतकपूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने या सर्व प्रकल्पांना चालना देण्याची विनंती केली. मंत्री महोदय यांनी सकारात्मकतेने व तत्परतेने पावलं उचलत यासंदर्भात पुढील कार्यवाही सुरू केली आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!