मुख्यमंत्री ग्रामसडक योजना…
संगमनेर तालुक्यातील रस्त्यांसाठी 40 कोटी
प्रतिनिधी —
आमदार बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून संगमनेर तालुक्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्त्यांसाठी 40 कोटी 73 लाख रूपये मंजुर झाला असल्याची माहिती थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांनी दिली आहे.

थोरात म्हणाले की, संगमनेर तालुक्यात 171 गावे व 248 वाड्या वस्ती आहेत. या सर्व गावांमध्ये आमदार थोरात यांच्या माध्यमातून सातत्याने विकासाच्या योजना राबवल्या जात आहेत. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत संगमनेर तालुक्यातील रस्त्यांसाठी 40 कोटी 73 लाख रूपये मंजुर झाला आहे. या अंतर्गत तालुक्यातील अनेक गावात रस्त्यांचे काम होणार आहे.

या अंतर्गत डिग्रस ते रणखांबवाडी रस्ता 3 कोटी 53 लाख रूपये, चिखली ते जवळेकडलग रस्ता 6 कोटी 32 लाख रूपये, खरशिंदे ते खांबे रस्ता 2 कोटी 46 लाख रूपये, मिर्झापूर ते धांदरफळ खुर्द रस्ता 5 कोटी 67 लाख रूपये, पारेगांव खुर्द-तिगाव ते वडझरी खुर्द रस्ता 6 कोटी 1 लाख रूपये, साकुर ते बिरेवाडी रस्ता 4 कोटी 82 लाख रूपये, शिंदोडी ते ठाकरवाडी रस्ता 4 कोटी 16 लाख रूपये, तासकरवाडी ते खंडेरायवाडी रस्ता 7 कोटी 76 लाख रूपये असा एकूण ४० कोटी ७३ लाख रुपयांचा निधी मंजुर झाला आहे.

या निधीमधून सदर गावांमधील रस्त्यांचे काम होणार आहे. त्यामुळे तालुक्यात अधिक मजबूत रस्त्यांचे जाळे निर्माण होणारा असून या रस्त्यांच्या कामासाठी निधी दिल्याबद्दल डिग्रस, चिखली, खरशिंदे, मिर्झापूर, पारेगांव खुर्द, साकुर, शिंदोडी, तासकरवाडी आदी गावामधील नागरिकांनी आमदार बाळासाहेब थोरात यांचे आभार व्यक्त केले आहेत.
