आमदार थोरात यांचे विशेष प्रयत्न…
संगमनेर तालुक्यातील शाळांच्या इमारत बांधकामासाठी ५ कोटी ५० लाख रुपयांचा निधी
शिक्षणाची गुणवत्ता वाढीसाठी काम
प्रतिनिधी —
आमदार बाळासाहेब थोरात यांच्या सततच्या पाठ पुराव्यातून जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत संगमनेर तालुक्यातील विविध गावांच्या शाळांच्या इमारत बांधकामासाठी ५ कोटी ५० लाख रुपयांचा मोठा निधी मंजूर झाले असल्याची माहिती डॉ. जयश्री थोरात यांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना डॉ. थोरात म्हणाल्या की, संगमनेर तालुक्यात 171 गावे व 248 वाड्या वस्ती आहेत. या सर्व गावांमध्ये आमदार थोरात यांच्या माध्यमातून सातत्याने विकासाच्या योजना राबवल्या जात आहेत. संगमनेर तालुका हा विकासाचे मॉडेल ठरला आहे. यात ग्रामीण भागातील शिक्षणाची गुणवत्ता सुधारावी म्हणून तालुक्यातील २८ गावांच्या शाळांच्या इमारत बांधकामासाठी ५ कोटी ५० लाखांचा मोठा निधी मिळाला आहे.

या अंतर्गत मौजे अंभोरे जि.प.प्राथ. शाळा 2 खोल्या 25 लाख, कुरण जि.प.प्राथ. शाळा 3 शाळा खोल्या 37 लाख 50 हजार, डिग्रस जि.प.प्राथ. शाळा 2 खोल्या 25 लाख, शेंडेवाडी (सतिचीवाडी) जि.प.प्राथ. शाळा 2 खोल्या 25 लाख, मिर्झापूर जि.प.प्राथ. शाळा मिर्झापूर 2 खोल्या 25 लाख, तळेगाव जि.प.प्राथ. शाळा 3 खोल्या 37 लाख 50 हजार, म्हसवंडी जि.प.प्राथ. शाळा 2 खोल्या 25 लाख, घारगांव जि.प.प्राथ. शाळा 2 खोल्या 25 लाख, कोकणगाव जि.प.प्राथ. शाळा 1 खोली 12 लाख 50 हजार, जांभूळवाडी जि.प.प्राथ. शाळा 1 खोली 12 लाख 50 हजार, शिंदोडी जि.प.प्राथ. शाळा 1 खोली 12 लाख 50 हजार, पिंपरणे जि.प.प्राथ. शाळा (रोहमवस्ती) 1 खोली 12 लाख 50 हजार, शिरापूर जि.प.प्राथ. शाळा 1 खोली 12 लाख 50 हजार रूपये, वडगाव लांडगा जि.प.प्राथ. शाळा 1 खोली 12 लाख 50 हजार, मालदाड जि.प.प्राथ. शाळा 1 खोली 12 लाख 50 हजार, पोखरी हवेली जि.प.प्राथ. शाळा 1 खोली 12 लाख 50 हजार, कासारे जि.प.प्राथ. शाळा 1 खोली 12 लाख 50 हजार, खांबे जि.प.प्राथ. शाळा खांबे 2 खोल्या 25 लाख, चिंचोली गुरव जि.प.प्राथ. शाळा 1 खोल्या 12 लाख 50 हजार, चिकणी जि.प.प्राथ. शाळा 1 खोली 12 लाख 50 हजार, पावबाकी जि.प.प्राथ. शाळा 1 खोली 12 लाख 50 हजार, चौधरवाडी जि.प.प्राथ. शाळा 1 खोली 12 लाख 50 हजार रूपये, ढोलेवाडी जि.प.प्राथ. शाळा 1 खोली 12 लाख 50 हजार, सावरगाव तळ जि.प.प्राथ. शाळा 1 खोली, 12 लाख 50 हजार, रायतेवाडी जि.प.प्राथ. शाळा 1 खोली 12 लाख 50 हजार, चिंचपूर जि.प.प्राथ. शाळा 1 खोली 12 लाख 50 हजार, चनेगाव जि.प.प्राथ. शाळा 2 खोल्या 25 लाख, चिखली जि.प.प्राथ. शाळा चिखली 4 खोल्या 50 लाख असा मोठा निधी मंजूर झाला आहे.

या निधीमधून सदर गावांमधील शाळांच्या कच्च्या इमारतींचे दुरुस्तीचे काम होणार आहे. हा निधी दिल्याबद्दल अंभोरे, कुरण, डिग्रस, शेंडेवाडी, मिर्झापूर, तळेगाव, म्हसवंडी, घारगाव, कोकणगाव, शिन्दोडी, पिंपरणे, शिरापूर, वडगाव लांडगा, मालदाड, पोखरी हवेली, खांबे, चिंचोली गुरव, चिकणी, ढोलेवाडी, सावरगाव तळ, रायतेवाडी, चिंचपूर, चनेगाव, चिखली आदी गावातील नागरिकांनी काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांचे आभार व्यक्त केले आहेत.
