संगमनेर पुरवठा विभागात कार्य प्रणाली बदलण्याची जास्त गरज !
संगमनेर दिनांक – 4
पुरवठा विभागासह सेतू कार्य प्रणाली बदलण्याची जास्त गरज असल्याची भावना सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
अनेक वयोवृद्ध, ज्येष्ठ नागरिक अपंग, महिला यांना सध्याच्या प्रणालीचा त्रास होत आहे. नाव कमी करणे, नाव दुरुस्ती, नाव समाविष्ट, नवीन शिधापत्रिका, बारा अंकी क्रमांक काढणे इत्यादी कामांसाठी आठ आठ नऊ नऊ महिने लागत आहेत. सर्वसामान्य नागरिक हेलपाटे मारून वैतागले आहेत.
ऑनलाइन प्रणाली हाताळणारा एकच कर्मचारी आहे. त्यात सर्व्हर आणि वेबसाईटचा प्रॉब्लेम येतो. साईट बंद पडली तर कामात अडथळा येतो. ऑनलाइन प्रणाली हाताळण्यासाठी कर्मचारी वाढवण्याची नितांत गरज असल्याची नागरिक करतात.
त्याचप्रमाणे पुरवठा विभाग येथे लाईट गेल्यानंतर कोणत्याही प्रकारे इन्व्हर्टर अथवा इतर तत्सम पर्यायी उपकरण नसल्याने अनेक वेळ नागरिकांना बसून राहावे लागते. यात नागरिकांच्या दैनंदिन कामकाजाचे आणि रोजीरोटीचेही नुकसान होते. तहसीलदार यांनी जातीने लक्ष घालून पुरवठा विभागाची कार्यप्रणाली बदलावी जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांना सर्व चांगल्या सुविधा मिळतील अशी मागणी नागरिकांची आहे.