आता लाडक्या बहिणींना घरही मिळणार !

विशेष प्रतिनिधी दि. 4

राज्य सरकार लाडक्या बहि‍णींसाठी आणखीन एक मोठा निर्णय घेणार आहेत. लाडक्या बहि‍णींना आता घरकूल योजनेतही लाभ मिळणार असून, याबाबत अधिकृत घोषणा देखील करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील नागरीकांना पंतप्रधान आवास योजनेचा मोठा लाभ मिळणार आहे. यातही लाडक्या बहि‍णींसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. १३ लाख पेक्षा अधिक घरकूल योजनेचा लाभ मिळणार असून, एका वर्षात २० लाखांपेक्षा जास्त घरं सामान्यांना मिळणार असल्याची घोषणा केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी कली. त्यांनी ही घोषणा पुण्यात झालेल्या राष्ट्रीय किसान दिनाच्या कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना केली. तसंच ज्यांच्याकडे दुचाकी गाडी आहे, त्यांनाही प्रधानमंत्री आवास योजनेतून घर मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘आज अत्यंत आनंदाचा दिवस आहे. पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकारनं साडेसहा लाख घरे मंजूर केली होती. मात्र यात वाढही करण्यात आली आहे. या योजनेतून १३ लाख घरं मंजूर करण्यात आलंय. तसंच यावर्षी गरिबांसाठी २० लाख घरे देण्याची घोषणा केंद्र सरकारनं केलीय. देशाच्या इतिहासात कोणत्याच राज्याला एका वर्षात इतकी घरे मिळालेली नाहीत. मोदी सरकारने महाराष्ट्राला दिलेली ही मोठी भेट आहे’.

आतापर्यंत या योजनेसाठी २६ लाख अर्ज आले होते. उर्वरित अर्जदारांना आपण पुढील वर्षी घरे देऊ. तसंच पूर्वी जे काही निकष होते, ते देखील सौम्य करण्यात आले आहेत. जे बेघर आहेत, शेतकरी असो किंवा महिला, अशा सर्वांना नव्या सर्वेक्षणात सामावून घेण्यात येणार आहे. तसंच निकषांनुसार ज्यांना खरंच गरज आहे, त्यांनाच घर देण्यात येणार आहे. मुख्य म्हणजे पुढील ५ वर्षात बेघर लोकांना घरं देण्याचं संकल्प मोदी सरकारनं केला आहे. यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे आभार मानतो’.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!