फेक न्यूज मुळे समाजात वैचारिक प्रदूषण — सुधीर लंके

संगमनेर दि.27 — 

फेक न्युज च्या माध्यमातून समाजात वैचारिक प्रदूषण तयार केले जातं त्यामुळे समाज व्यवस्थेला धोका निर्माण होतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून काही चांगल्या गोष्टी तर काही विकृत घटना घडतात यासाठी माहिती तपासून घ्यायला हवी युवा पिढी ही समाज माध्यमाच्या विळख्यात अडकली आहे म्हणून समाज माध्यमातून चुकीची माहिती पाठविल्यास भविष्यात पर्यावरण धोक्यात येण्याची शक्यता असल्याची प्रतिपादन दैनिक लोकमतचे निवासी संपादक सुधीर लंके यांनी केले. व्यापारी असोसिएशन हॉलमध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या १३६ व्या जयंतीनिमित्त जाहीर व्याख्यान व पुरस्कार वितरण सोहळ्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. राहुल हांडे हे होते.

यावेळी व्यासपीठावर मौलाना अयुब नदवी, अब्दुल्ला चौधरी, कुसुमताई माघाडे, प्रा. बाबा खरात, अजित अेाहरा, हाफिज शेख, आदी मान्यवर उपस्थित होते.

सुधीर लंके पुढे म्हणाले की, माध्यम समाजाची गरज असून पत्रकारिता समाजाला विचार मंथन करायला लावते लोकांना लढण्याची प्रेरणा देते हे पत्रकारितेचे मूळ आहे तर मौलाना आझाद यांनी शैक्षणिक दृष्ट्या अल्पसंख्याक समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्याचे कार्य केले विविध जाती धर्माच्या लोकांना आपल्या धर्माप्रमाणे आचरण करण्याचे स्वातंत्र्य आहे धर्मनिरपेक्षतेची मांडणी आपल्या देशात आझाद यांनी केली.

एकता सामाजिक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष असिफ शेख व त्यांचे सहकारी जे समाज प्रबोधनाचे कार्य करत आहेत ती आज खऱ्या अर्थाने समाजाची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

या जयंती सोहळ्यात डॉ. सलीम शेख (समाज रत्न), शहा नवाज शहा (आरोग्य मित्र), अरविंद गाडेकर (व्यंगचित्रकार), तसेच अफसर तांबोळी (समाज रत्न) आदींना लंके यांच्या हस्ते राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले याप्रसंगी डॉ. जी. पी. शेख, अनिल भोसले,बानोबी शेख, जाकिर पेंटर, दर्शन जोशी, विनोद गायकवाड, जानकीराम भडकवाड, शानू बागवान, शौकत पठाण, मुर्तुजा बोहरी, इरफान फिटर, आदिसह सर्वधर्मीय बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन अनिल भोसले यांनी केले तर असिफ शेख यांनी आभार मानले.

Oplus_131072

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!