आमदार थोरात यांच्या प्रचारानिमित्त संगमनेर मध्ये शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) बूथप्रमुखांचा मेळावा..
प्रतिनिधी —
संगमनेर विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्राचारार्थ शिवसैनिकां व बुथ प्रमुख, पदाधिकारी मेळावा नुकताच पार पडला.

आमदार बाळासाहेब थोरात यांची ही नववी निवडणूक आहे. त्यामुळे त्यांना सलग विजय मिळणार असून त्यांना यावेळी जास्त मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार या मेळाव्यात शिवसैनकांनी व्यक्त केला.

जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे पाटील, सपंर्क प्रमुख ॲड. दिलीप साळगट, विधानसभा संघटक कैलास वाकचौरे, शहर प्रमुख आप्पा केसेकर, उपजिल्हा प्रमुख अशोक सातपुते, महिला आघाडी शीतल हासे, अल्पना तांबे, संगीता गायकवाड, सुनीता केदारी, तालुकाप्रमुख संजय फड, जालिंदर लहामगे, भय्या तांभोळी, बाळासाहेब डावखरे, हरीश लांडगे, योगेश खेमनर, डॉ. आदित्य साळगट, कैलास बिहाणी, सचिन दिघे, गोकुळ लांडगे, सतीश भुजबळ, दीपक साळुंके, पप्पु कानकाटे, रामदास दिघे, संकेत खुळे, निलेश गुंजाळ, संदेश देशमुख, बाळासाहेब देशमुख, विलास साळवे, प्रताप कडलग, सोपान खर्डे, प्रवीण कडलग, अरुण भालेराव, निलेश भालेराव, भीमाशंकर पावसे असंख्य शिवसैनिक हजर होते.

