शिक्षण विभागातील लिपिक प्रशांत नेटावटे यांची तात्काळ बदली करा अन्यथा आंदोलन – शिक्षक भारती संघटनेचा इशारा
प्रतिनिधी —
विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय, पुणे येथील भ्रष्ट व मग्रूर लिपिक प्रशांत नेटावटे यांची तात्काळ बदली करून त्यांच्यावर कारवाई करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शिक्षक भारती संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, शिक्षक भारती संघटनेकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. वरिष्ठ शिक्षक, प्राचार्य यांच्याशी असभ्य वर्तन, महिलांशी वाद घालणे, जाणून बुजुन फाईल अडवणे, फाईल गहाळ करणे, फाईल निवेदन इनवर्ड न करणे, शालार्थ आय.डी. प्रकरणे प्रलंबीत ठेवणे, आर्थिक देवाण घेवाण करणे, शिक्षक-शिक्षेकेतर कर्मचाऱ्यांच्या संस्थेस सांगून त्यांना त्रास देणे, कर्मचाऱ्यांना शारीरिक मानसिक त्रास देणे, संघटना पदाधिकारी यांना उडवा उडवीची उत्तरे देणे अशा विविध तक्रारीमुळे संबंधित लिपिक नेटवटे यांची तात्काळ बदली करण्यासंदर्भातले निवेदन शिक्षण आयुक्त पुणे, शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्चमाध्यमिक) पुणे, विभागीय उपसंचालक पुणे यांना देण्यात आले आहे.

सदर बदली झाली नाही तर शिक्षक भारती आंदोलनाच्या पवित्र्यात आहे, असा इशाराही शिक्षक भारती विनाअनुदान संघर्ष समिती राज्याध्यक्ष जयवंत भाबड, महिला राज्याध्यक्ष रूपाली कुरुमकर यांनी दिला आहे.
संबंधित लिपिक नेटावटे यांची चौकशी करून दप्तर दिरंगाई कायद्याअंतर्गत कारवाई करून तात्काळ बदली करावी अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणीला राज्याध्यक्ष अशोक बेलसरे, कार्याध्यक्ष सुभाष मोरे, राजेंद्र लोंढे, सुनील गाडगे, विनोद रोकडे, के.के. अहिरे जयवंत भाबड, आप्पासाहेब जगताप, रामराव काळे, महेश पाडेकर आदी पदाधिकारी यांनी पाठिंबा दिला आहे.

