केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी संगमनेरमध्ये केले अभंग कुटुंबीयांचे सांत्वन
प्रतिनिधी —
आरपीआय (आठवले) पक्षाचे माजी तालुका अध्यक्ष अशोक अभंग यांचे नुकतेच निधन झाले. दलित चळवळीतील कार्यकर्ता म्हणून परिचित असलेल्या अभंग यांच्या कुटुंबियांचे सोमवारी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भेट घेत सांत्वन केले.

यावेळी आठवले यांच्या समवेत अहिल्या नगर जिल्हा संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव, राज्य सचिव विजय वाकचौरे, राजाभाऊ कापसे, भीमा बागुल, शहराध्यक्ष कैलास कासार, आशिष शेळके, शानू बेगमपुरे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आठवले सोमवारी अहिल्यानगर जिल्हा दौऱ्यावर आले होते. ज्यावेळी त्यांनी अभंग यांच्या कुटुंबियांचे भेट घेत दुःख व्यक्त केले.

