ख्रिस्ती समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी काॅंग्रेस कटिबद्ध — आमदार बाळासाहेब थोरात

प्रतिनिधी —  

ख्रिस्ती मिशनरी आणि आताचा ख्रिस्ती समाज यांचे शिक्षण, आरोग्य यासह विविध क्षेत्रात मोलाचे योगदान आहे. या समाजाने कधीही भावनांचा उद्रेक होऊन दिला नाही. शांत, संयमी अशा या समाजाने नेहमीच संविधानाचा आदर राखला आहे. संविधानिक, आणि अहिंसक मार्गाने सामाजिक न्याय व राष्ट्रीय एकात्मता राखणे यावर काॅंग्रेस पक्षाचा विश्वास असून ख्रिस्ती समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी काँग्रेस कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.

यावेळी राज्यस्तरीय बैठकीमध्ये दिलीप नाईक, सतीश मेहंद्रे, सॉलोमन गायकवाड, राजन नायर, विजय नाळे, डॉ. राजीव इंगळे, बबन कांबळे, अनिल भोसले, प्रा. बाबा खरात आदी उपस्थित होते.

आमदार थोरात म्हणाले की, ख्रिस्ती समाजाचे नेहमीच पक्षाला पाठबळ मिळते हे दुर्लक्षित करता येत नाही. यासोबतच गरीब व गरजवंतांसाठीचे त्यांचे योगदान प्रेरणादायी आहे. यावेळी डॉ. सुधीर तांबे हे देखील उपस्थित होते. त्यांनीही, ख्रिस्ती समाजाच्या अडचणी दूर होण्यासाठी काॅंग्रेस पक्ष प्रयत्नशील राहिल अशी ग्वाही दिली.

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी आपल्या मनोगतातून समाजाच्या प्रलंबित मागण्या आणि सद्य स्थितीत समाजाच्या अडचणी यावर भाष्य केले. थोरात यांच्या हस्ते सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या स्मृती प्रित्यर्थ स्मृतिचिन्ह देऊन पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

या बैठकीस दीपक कदम, अविनाश काळे, चंद्रकांत उजागरे, नरेंद्र गेडाम, प्रफुल्ल असुरलेकर, डँरील डिसोझा, वॉल्टर कांबळे, किरण चांदेकर, डेव्हिड काळे, बन्यामीन काळे, अजित सुडगे, रमेश गावित, सॅमसन लोबाे, भाऊसाहेब तोरणे, आयशा मुक्री, प्रदीप पवार, भाऊसाहेब नेटके, श्रीधर भोसले, प्रभाकर चांदेकर, दिनकर यादव आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते. ख्रिस्ती विकास परिषदेचे अध्यक्ष अनिल भोसले यांनी आभार मानले.

 

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!