पोखरी हवेलीत पाणीपुरवठा पाईप लाईन व विद्युत पंपाचे उद्‌घाटन

प्रतिनिधी —

विजयादशमीच्या मुहूर्तावर पोखरी हवेली येथील पाणीपुरवठा पाईपलाईन व विदयुतपंपाचे उद्घाटन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल नागणे यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी सरपंच सुदाम खैरे, उपसरपंच सोमनाथ थिटमे, सर्व ग्रामपंचायत सदस्य,पोलीस पाटील तुषार नवले, सोपान दये, गजानन घुले, नारायण कोल्हे, तुकाराम गवांदे, कृष्णा गवांदे, सचिन आगळे, किरण दये, बाबासाहेब गवांदे, काशिनाथ गायकवाड, अनिल गायकवाड , बाबासाहेब थिटमे, बाबासाहेब आगळे, रोहिदास गवांदे, गोपीनाथ आगळे, वाल्मिक गागरे, ग्राम‌पंचायत अधिकारी अनिता माळी, ठेकेदार विनोद जाधव आदिसह ग्रामस्थ व महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.

पोखरी हवेली येथील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला नियमित व स्वच्छ पाणीपुरवठ्याचा प्रश्न या उदघाटनामुळे सुटला असल्यामुळे ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर आनंद होता. या गावास तळेगाव ग्रामीण प्रादेशिक पाणीपुरवठ्याअंतर्गत पाणीपुरवठा होतो. परंतु अनियमित पाणीपुरवठा व अस्वच्छ पाणी यामुळे नागरिक अत्यंत त्रस्त होते. सदर कारणास्तव ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या वतीने इनाम जमीन येथे असलेल्या सार्वजनिक विहीरीतून गावाला पाणीपुरवठ्यासाठी पाईपलाईनचे नियोजन करण्यात आले.

जिल्हा परिषद सेस फंडातून या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला. त्यासोबतच ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी आर्थिक सहकार्य केले. त्याच विद्युत पंपाचे उदघाटन स्विच चालू करून करण्यात आले. तसेच स्वच्छ भारत मिशन अभियान अंतर्गत सार्वजनिक शौचालयाच्या बांधकामाचेही भुमिपूजन करण्यात आले. वृक्षलागवड ही याप्रसंगी करण्यात आली.आपले गाव स्वच्छ, सुंदर व हरित करण्यासाठी सर्वांनीच कटीबद्ध राहिले पाहिजे असे प्रतिपादन नागणे यांनी सत्काराला उत्तर देतांना केले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी संगणक परिचालक संतोष साळुंके, ग्रा. पं. कर्मचारी कैलास आव्हाड, विकास रुपवते, सर्व अंगणवाडी सेविका, आशा सेविका, शिक्षक यांनी विशेष परिश्रम घेतले.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!