जनसेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रतिनिधी —
शिर्डी विधानसभा मतदारसंघातील मालुंजे या गावातील जनसेवा मंडळाच्या अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षात प्रवेश केला असून ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिर्डी मतदारसंघात विखे गटाला धक्का बसला आहे अशी माहिती आमदार थोरात यांच्या यशोधन या जनसंपर्क कार्यालयातून देण्यात आली आहे.

अमृतवाहिनी सहकारी बँक येथे मालुंजे येथील कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. यावेळी शेतकी संघाचे संचालक संतोष नागरे, मार्केट कमिटीचे संचालक संजय खरात, युवक काँग्रेसचे शेखर सोसे, सोसायटीचे व्हा.चेअरमन सुमित सोसे, लहानू नागरे, कल्पेश आव्हाड, योगेश जोशी, मल्हारी ईघे आदी उपस्थित होते.

जनसंपर्क कार्यालयाकडून देण्यात आलेल्या प्रेस नोट मध्ये म्हटले आहे की, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका हा विकासाचे मॉडेल ठरला असून आमदार थोरात यांनी कायम सर्वधर्मसमभाव जोपासत गोरगरीब व सर्वसामान्यांच्या विकासासाठी काम केले आहे. सर्वांना समान संधी दिली आहे. याउलट भाजपामध्ये फक्त दडपशाही होत असून निवडणुकीसाठी वापर केला जातो. त्यामुळे जनसेवा मंडळाच्या राजेंद्र आव्हाड, संपत सोसे, संदीप डोंगरे, प्रकाश खरात, संजय चाटे, भाऊसाहेब खरात, वैभव सोसे, साहेबराव सोसे, रमेश पिंपळे, सोमनाथ पिंपळे, संतोष घुगे, भिकाजी भागा घुगे, प्रवीण गाडेकर, गोविंद सोसे यांच्यासह अनेक युवकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

यावेळी बोलताना संतोष नागरे म्हणाले की, संगमनेर तालुका हा विस्ताराने मोठा असून या तालुक्यातील 28 गावे शिर्डी विधानसभा मतदारसंघाला जोडली आहे. या गावांमधील नागरिकांचे काम फक्त आमदारकी पुरते शिर्डी मतदार संघाशी संबंधित असते अन्यथा सर्व कामे ही संगमनेर तालुक्याशी संबंधित असतात संगमनेर तालुका सुसंस्कृत आणि पुरोगामी विचारांचा तालुका आहे येथे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे आणि म्हणून जनसेवा मंडळाचे अनेक कार्यकर्ते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास उत्सुक आहेत यापुढेही अनेक लोक काँग्रेस पक्षात येणार आहेत. मालुंजे येथील अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने विखे गटाला खिंडार पडले आहे.

या सर्व नवीन प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, डॉ.जयश्री थोरात, गणपतराव सांगळे, सुरेश थोरात, राजेंद्र चकोर, विक्रम थोरात आदींसह विविध पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
