मित्राच्या स्मरणार्थ दिव्यांग विद्यार्थ्यांना गणवेश वाटप !

नाशिक – नगरच्या प्रतीक फाउंडेशनचा उपक्रम

प्रतिनिधी —

ऐन तारुण्यात मृत्यूला सामोरे जावे लागलेल्या मित्राच्या आठवणी प्रित्यर्थ त्याच्या इतर सर्व मित्रांनी विविध सामाजिक उपक्रम राबवले असून दरवर्षी या आपल्या स्वर्गीय मित्राच्या जन्मदिनी जीवनावश्य वस्तूंचे वाटप गरजूंना करण्यात येते. यावर्षी संगमनेर येथील संग्राम संस्था संचालित मूकबधिर विद्यालय आणि मतिमंद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले.

नाशिक जिल्ह्यातील प्रतीक विलास जाधव यांचे अचानक हृदयविकाराने निधन झाले. ते पोलीस विभागात नोकरीस होते. अचानकपणे दुःखाचा डोंगर त्यांच्या परिवारावर कोसळला होता. त्यानंतर त्यांच्या सोबत असणाऱ्या जिवाभावाच्या मित्रांनी आपल्या या मित्राची आठवण म्हणून हा उपक्रम सुरू केला आहे. नाशिक आणि नगर जिल्ह्यातील मित्रांनी एकत्र येत प्रतीक फाउंडेशनची स्थापना करून गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याचे ठरविले. आपापसात वर्गणी गोळा करून या मदतीचे वाटप करण्यात येते. स्वर्गीय प्रतीक जाधव यांचे कुटुंबीय देखील यात सहभागी होत असतात.

माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या संग्राम संस्था संचालित मूकबधिर आणि मतिमंद विद्यार्थ्यांच्या शाळेत (संगमनेर, जि. अहमदनगर) गणवेश वाटप करण्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी स्वर्गीय जाधव यांच्या कुटुंबीयांसह त्यांचे मित्र उपस्थित होते. तसेच शाळेतील शिक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते.

गणवेश वाटपानंतर मुलांच्या चेहऱ्यावर आनंद अगदी ओसंडून वाहत होता. संस्थेच्या शिक्षकांनी प्रतीक फाउंडेशन च्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले. यावेळी फाउंडेशनचे राहुल गायकर, उमेश पोरजे, दीपक गोजारे, सायली सूर्यवंशी, रोशन बा, करण अग्रवाल, योगेश मालवडे, सचिन शिंदे, तुषार लभडे, आशुतोष जांभळे तसेच स्वर्गीय प्रतीक जाधवचे बंधू प्रणय जाधव, मनोज जाधव, प्रशांत वाकचरे, अजिंक्य वाघ, राहुल भांगरे सचिन मस्के आदी उपस्थित होते. मूकबधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील कवडे, सामाजिक कार्यकर्ते आनंद आल्लेउपस्थित होते. तर संस्थेच्या वतीने येथील शिक्षक भाऊसाहेब नरवडे यांनी भाषणातून सर्व उपस्थितांचे आणि प्रतीक फाउंडेशनचे आभार मानले.

 

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!