५१ हजार वृक्षारोपण संकल्प पूर्ती सोहळा संपन्न
प्रतिनिधी —
मालपाणी परिवार चारिटेबल ट्रस्ट संगमनेर यांच्या सहकार्याने, ग्रामपंचायत धांदरफळ बुद्रुक व ग्रामस्थ यांचे लोकसहभागातून दंडकारण्य अभियान अंतर्गत हरित वसुंधरा अभियानाचे प्रमुख आणि उद्योजक मनीष मालपाणी यांच्या वाढदिवसानिमित्त संगमनेर तालुक्यातील कारेश्वर हिल्स या ठिकाणी ५१ हजार वृक्षारोपण संकल्प पूर्ती सोहळा संपन्न झाला.
या सोहळ्यासाठी संगमनेर तालुक्याचे आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, डॉक्टर जयश्री थोरात, सुवर्णा मालपाणी, राजेश, संजय, गिरीश व आशिष हे मालपाणी बंधू, भाऊसाहेब ढेरे, सागर केदार, वनविभागाचे संदीप पाटील, धांदरफळ गावच्या सरपंच उज्वला देशमाने आदी उपस्थित होते.
यावेळी वृक्षदिंडी देखील काढण्यात आली. वृक्षदिंडीमध्ये ग्रामपंचायत शाळेचे व ध्रुव अकॅडमीतील विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रमाप्रसंगी सर्व प्रमुख पाहुण्यांची यथोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय कासार यांनी केले.
