संगमनेरात घरफोडी ; दागिन्यांसह रोख रक्कम लंपास !
प्रतिनिधी —
संगमनेर शहरातील घरफोड्यांचे सत्र अधून मधून सुरूच असते. बस स्थानकावरील पाकीट माऱ्या, चोऱ्या शिथिल होतात न होतात तोच घरफोड्या आणि चोऱ्या सुरू होतात. संगमनेर शहरातील उपनगरात अशीच मोठी घरफोडी झाली असून सोने चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम आणि घरातील चीज वस्तू चोरून नेण्यात आल्या आहेत.
शहरातील गणेश विहार कॉलनी येथे संदीप कानकाटे यांच्या राहत्या घराचा कडी कोयंडा व कुलूप तोडून रात्रीच्या वेळी कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून कपाटा मधील साड्यांच्या खाली ठेवलेल्या चाव्यांनी लॉकर उघडून सोने चांदीचे दागिने, रोख रक्कम चांदीचे देव, एलईडी टीव्ही आणि इतर पितळी वस्तू असा एकूण 3 लाख 64 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.

संदीप राजाराम कानकाटे, (मूळ राहणार लोहारे कासारे, हल्ली राहणार गणेश विहार कॉलनी, संगमनेर) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली असून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भान्सी हे करत आहेत. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी भेट दिली आहे.

दुधगंगा पतसंस्था मधील घोटाळ्यात आरोपी भेटले असताना देखील पुढे पोलिसांनी काय कार्यवाही केली याचा काही थांग पत्ता लागलाच नाही?
कधी पर्यंत सामान्य जनतेला न्याय मिळेल?
की पुन्हा सगळे पुढारी/ विकली गेलेली मिडिया/ लाचखोर लोक पैसे खाऊन घोटाळ्यात सामिल असलेल्या लोकांना पाठीशी घालतील?
सामान्य जनतेचा अती सामान्य प्रश्न