सायखिंडी फाटा परिसरातील 100 युवकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

प्रतिनिधी —

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशाचा विकास झाला आहे त्यामध्ये काँग्रेसचे मोलाचे योगदान आहे राष्ट्रीय एकात्मता सर्वधर्मसमभाव आणि संविधान जपणारा या पक्षाचे भवितव्य उज्वल असून काँग्रेस विधिमंडळाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सायखिंडी फाटा परिसरातील रोशन गोफनें सह 100 युवकांनी युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

यशोधन जनसंपर्क कार्यालय येथे रोशन गोफने व 100 युवकांनी प्रवेश केला. यावेळी युवक काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ.जयश्री थोरात, शहराध्यक्ष निखिल पापडेजा, शैलेश कलंत्री, तानाजी शिरतार, गौरव डोंगरे, शेखर सोसे, हर्षल राहणे, सनी ठोंबरे, सुमित पानसरे, विजय पवार, योगेश गुरुकुले, हृतिक राऊत, कमलेश उनवणे, ओंकार अभंग, ओमकार बिडवे, हैदर अली सय्यद, बच्चन जाधव, अंबादास आडेप यांचे सह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

डॉ.जयश्री थोरात म्हणाल्या की, काँग्रेस पक्षाला मोठी त्यागाची व बलिदानाची परंपरा आहे. देशाच्या विकासात काँग्रेसचे अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान असून राज्यांमध्ये आणि देशांमध्ये ही काँग्रेस पक्ष उभारी घेत आहे. महाविकास आघाडीवर लोकांचा विश्वास वाढला आहे संविधान वाचवणारा हा पक्ष असून युवकांना या पक्षामध्ये काम करण्यास मोठी संधी आहे.

संगमनेर तालुका हा सुसंस्कृत आणि प्रगतीशील तालुका असून इतर शेजारील काही तालुक्यांमध्ये दडपशाहीचे राजकारण आहे. याउलट संगमनेर मध्ये शांतता आणि सुव्यवस्थेबरोबर सर्वांना बरोबर घेऊन विकास साधला जात आहे. जास्तीत जास्त तरुणांनी काँग्रेस पक्षासह समाजकार्य काम करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी रोशन गोफणे म्हणाले की, आमदार बाळासाहेब थोरात यांचे राज्यव्यापी नेतृत्व असून त्यांच्यामुळे संगमनेर तालुक्याचा राज्यात सन्मान होत आहे. हे सर्व तरुणांसाठी अभिमानास्पद आहे. यापुढील काळात काँग्रेसच्या माध्यमातून जास्तीत जास्त जन विकासाची कामे करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी मल्हारी जेडगुले, मतेश जेडगुले, बाळू सातपुते, बाळा कुटे, ज्ञानेश्वर खेमनर, आदींसह विविध तरुण उपस्थित होते.या कार्यक्रमात तानाजी शिरतात गौरव डोंगरे निखिल पापडेजा यांनी मनोगते व्यक्त केली.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!