पोलिसांनी मानवी कवट्या पकडल्या ! जादूटोण्याचा अघोरी प्रकार ?
प्रतिनिधी —
अघोरी कृत्य जादूटोणा करण्यासाठी प्लास्टिकच्या मानवी कवट्यांचा वापर केला जात असल्याचे समोर आले असून नाशिक येथील पंचवटी भागात पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे.
पंचवटी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एंरडवाडीतील कालिकामात मंदिर परिसरात एका गोणीत प्लास्टिकच्या मानवी कवट्या आढळून आल्या होत्या. कालिकामाता मंदिरात एक व्यक्ती अघोरी कृत्य करत असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे.
नाशिकच्या पंचवटीतून हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या परिसरातून प्लास्टिकच्या मानवी कवट्यासह त्या इसमाला नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीविरोधात जादूटोणा कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.
