MSEB च्या कर्मचाऱ्याला विद्युत खांबाला बांधलं !

सरपंचाचा कारनामा

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —

वीजपुरवठा सतत खंडित होत असल्याने चिडलेल्या गावच्या सरपंचाने महावितरणाच्या एका कर्मचाऱ्याला तब्बल दोन तास विद्युत खांबाला बांधून ठेवल्याची धक्कादायक घटना विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात घडली आहे. खांबाला बांधून ठेवल्यावर मोठ्या संख्येने गावकऱ्यांनी गर्दी केली होती. महावितरणच्या सहायक अभियंत्याने कर्मचाऱ्याला सोडवून आणले. पोलिसांनी सरपंचा विरोधात गुन्हा नोंदवला आहे.

महावितरणचे कर्मचारी सुरज परचाके नेहमीप्रमाणे परचाके उसगावला निघाले होते. मार्गात नकोडा येथील सरपंच किरण बंदुरकर यांनी त्यांना अडवलं. गळ्यातील दुपट्ट्याने विद्युत खांबाला बांधले. बांधताना तिथे मोठ्या संख्येने गावकरी जमा झाले होते. या दरम्यान सरपंचांनी मारहाण केल्याच्या आरोप सुद्धा कर्मचाऱ्यांनी केला आहे.

दोन तासानंतर या प्रकारची माहिती सहायक अभियंता नयन भटारकर यांना मिळाली. भटारकर यांनी घटनास्थळी जाऊन परचाके यांना सोडवलं. त्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनला धाव घेतली. तक्रारीवरून सरपंचावर विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नकोडा गावातील विद्युत पुरवठा अनियमित होता. यातून हा प्रकार घडल्याचं सांगण्यात येत आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!