उद्या शुक्रवार दिनांक 24 मे रोजी….
सर्वपक्षीय निळवंडे धरण चाक बंद आंदोलन !
प्रवरा व निळवंडे कालव्यांमधून सोडलेले पाणी बंद करण्याची मागणी…
प्रतिनिधी —
अकोले तालुक्यातील भंडारदरा व निळवंडे जलाशयातून अमाप पाणी वाहून नेले जात आहे. निवडणूक आचारसंहिता असल्याने आपण आंदोलन करू शकत नव्हतो. परिणामी दोन्ही धरणे रिकामी होत आली आहेत.
पुढील अंदाज घेता आता पाणी बंद केले तर जेमतेम दोन पिण्याच्या पाण्याची आवर्तने होतील. पाणी बंद केले नाही तर प्यायलाही पाणी राहणार नाही. परिस्थितीचे गांभीर्य पाहता तातडीने आंदोलनाचा पवित्रा घेणे आवश्यक असल्याचे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचे मत बनले.

त्यामुळे उद्या शुक्रवार दिनांक 24 मे 2024 रोजी सकाळी आठ वाजता निळवंडे धरणाचे चाक बंद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती कॉम्रेड डॉक्टर अजित नवले यांनी दिली आहे. दरम्यान आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या उपस्थितीत पाटबंधारे कार्यालयात याबाबत बैठक झाली मात्र त्यातून कोणताही तोडगा निघाला नसल्याची माहिती समजली आहे

निळवंडे धरणाचे चाक बंद आंदोलन करण्यासाठी ‘निळवंडे काटा’ याठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचा निर्णय झाला आहे. पंचक्रोशीतील सर्वपक्षीय शेतकरी बंधू व भगिनींनी या आंदोलनासाठी उपस्थित राहावे असे आवाहन सर्वपक्षीय कार्यकर्ते तथा अकोले तालुका पाणी हक्क संघर्ष समिती यांनी केले आहे.
