संगमनेर वीज वितरण विभागाचा ढिसाळ कारभार !

सरकारी चुकीच्या धोरणामुळे विजेचा खेळखंडोबा…

प्रतिनिधी —

निवडणुकीसाठीचे राजकारण करणारा भाजपा पक्ष आणि सत्तेसाठी काम करणारे शिंदे व पवार गट यामधून महाराष्ट्रात मोठी हेळसांड निर्माण झाली असून सरकारी चुकीच्या धोरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रासह संगमनेर तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात वीज धोरणाचा बट्ट्याबोळ झाला असल्याचा आरोप युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुभाष सांगळे व असंघटित कामगार संघटनेचे तालुकाध्यक्ष जयराम ढेरंगे यांनी केली आहे

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, संगमनेर शहरात वीज वितरण कंपनीच्या कारभारामुळे भर उन्हाळ्यात नागरिकांना उकडा सोसावा लागत आहे. दिवसा अचानक अनेक वेळा लाईट जाणे. शहराच्या एकाच विभागात सातत्याने वितरणाचा तांत्रिक प्रॉब्लेम तयार होणे. रात्रीच्या वेळी लाईट जाणे. अपूर्ण दाबाने लाईट मिळणे हे सर्रास झाले आहे. याचबरोबर ग्रामीण भागातही वितरणाचा आणि पुरवठ्याचा मोठा खेळखंडोबा केला जात आहे. संगमनेर तालुक्याच्या बाबत हा त्रास मुद्दामहून दिला जातो की काय अशी शंका नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

संगमनेर तालुका विस्ताराने मोठा असून सुद्धा या विभागांमध्ये अपूर्ण कर्मचारी आहेत. तालुक्यात जास्त प्रमाणात जागा रिक्त आहेत. त्या जागांवर चुकीच्या लोकांची नेमणूक केली आहे. कर्मचाऱ्यांचे वेळेवर कामावर नसणे, गावोगावी वायरमन हजर नसणे, मुख्य कार्यकारी अभियंता यांचा प्रशासनावर नसलेला अंकुश यामुळे सर्वत्र अनागोंदी कारभार सुरू आहे.

तरी सरकारने व वीज वितरण विभागाने नागरिकांना त्रास न देता पूर्ण दाबाने वीज पुरवठा करावा. रात्रीच्या वेळी वीज सुरळीत सुरू ठेवावी. विनाकारण वीज वितरण कंपनीच्या दुर्लक्षणामुळे सातत्याने होणारा खंडित वीज पुरवठा आणि तांत्रिक बाबींकडे लक्ष नसल्यामुळे केवळ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे शहरात आणि तालुक्यात जनतेला त्रास सहन करावा लागत आहे.

शहरात आणि ग्रामीण भागात वितरण कंपनीचे कर्मचारी नियुक्त ठिकाणी हजर नसतात. अनेक वेळा कर्मचाऱ्यांना फोन करून बोलवावे लागते. फोन उचलले जात नाहीत. याचबरोबर ग्रामीण भागामध्ये सर्व कर्मचारी वेळेत हजर ठेवावे अशी मागणी करण्यात आली असून यामध्ये वेळीच तात्काळ दुरुस्ती न झाल्यास वीज वितरण कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवक काँग्रेस व असंघटित कामगार काँग्रेस संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

 

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!