अकोले मेडिकलचे ५५ व्या वर्षात पदार्पण.!

अलताफ शेख

आज २६ जानेवारी भारताचा ७२ वा प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना अकोलेकरांना वैद्यकीय औषध सेवा पुरवणारे हाजी कादरभाई तांबोळी यांचे अकोले मेडिकल स्टोअर ५४ वर्ष पूर्ण करुन ५५ व्या वर्षात पदार्पण करत आहे. अतिशय मेहनत व प्रामाणिकपणे व्यवसायात तिसरी पिढीही कार्यरत आहे

आर्थिक दृष्ट्या खुप श्रीमंत होण्या पेक्षा माणूस म्हणून खुप श्रीमंती मिळवावी अशी धारणा असलेले अकोलेतील जुने जानत्या व्यावसायिकापैकी एक व्यावसायिक म्हणजे कादरभाई तांबोळी.

आपले पदवी पर्यतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरी मिळत असताना पैगबंरवासी वडिल सजनभाई यांच्या ‘अकोलेतच काहीही व्यवसाय कर पण परगावी जावु नको’ या इच्छेनुसार व बहीण रोशनबी, थोरले बंधु अब्दुलभाई, हाजी गुलाबभाई, हाजी अहमदभाई, जिवलग मित्र कॉम्रेड बुवासाहेब नवले यांचे नातू कै. बाळासाहेब शंकरराव नवले यांच्या अनमोल सहकार्याने अकोले शहरात जुन्या भुविकास बँक येथे
२६ जानेवारी १९६८ रोजी शहरातील दुसरे मेडिकल स्टोअर सुरु केले.

त्यावेळी मेडिकल स्टोअरचे उद्धघाटन संगमनेर चे तत्कालीन मेडिकल ऑफिसर डॉ.पालवे यांच्या हस्ते व मॅाडर्न हायस्कूलचे प्रा.फडके. डॅा.अनंतराव देशपांडे, डॉ.बी.जी.बंगाळ, डॉ.शिवाजीराव बंगाळ, डॉ.अब्बासभाई फारुकी, डॉ.देशपांडे, डॉ. इर्शादभाई फारूकी, डॉ.वैरागडे यांच्या उपस्थित पार पडले.
त्या पहिल्या दिवशी दुकानात औषध विक्री १० रुपयांची झाली होती.

समशेरपुर, कोतूळ, राजुर, बेलापुर, ब्राह्मणवाड़ा येथून रुग्ण उपचारा साठी अकोल्यात येत असायचे त्यांना कधी साधनांची अड़चन, कधी पैशाची अडचण असायची मात्र कादरभाईनी पैशा अभावी कोणाची अडवणुक केली नाही. आणि त्या ग्राहाकाने उधारीही ठेवली नाही.

त्या काळी दुकानात थोर स्वतंत्र सैनिक कॉ.बुवासाहेब नवले, साथीअमृतभाई मेहता, आमदार यशवंतराव भांगरे या सारखी ऋषीतुल्य नेत्यांची वैचारिक बैठक होत असल्या कारणाने त्यांचा सहवास आणि समाजकारणाची आवड़ कादरभाईना निर्माण झाली.
कादरभाईना आपल्या ५४ वर्षाच्या व्यवसाय सेवा काळात अनेक डॉक्टर, राजकीय, सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर व्यक्तिचा सहवास लाभला.
गेली ५४ वर्षापासून अविरत अकोलेकरांना सेवा पुरवणारे अकोले मेडिकल चे कादरभाई यांचे चिरंजीव आरीफभाई व डॅा.असिफ यांनीही या व्यवसायात योगदान दिले आहे. आता नुकतीच कादरभाई यांच्या तिसरी पिढीचा वारसा नातु उमैर हा फार्मसीचे शिक्षण पुर्ण करुन अकोले मेडिकल परीवारात सहभागी झाला आहे.
त्याच्या माध्यमातून आता अकोले मेडिकल स्टोअरची तिसरी पिढी या व्यवसायाने अकोलेकरांची सेवा करत आहे.
अश्या तिन पिढीपासुन सेवा देणारे अकोले मेडिकल आज ५४ वर्षाचा प्रवास पूर्ण करत असल्याने त्यांना हार्दिक शुभेच्छा …!

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!