ई श्रम कार्ड नोंदणी कॅम्प ;
छत्रपती युवा प्रतिष्ठान टाकळी यांचा उपक्रम

प्रतिनिधी —

टाकळी येथील छत्रपती युवा प्रतिष्ठान यांच्यावतीने ‘ई श्रम कार्ड: नोंदणी कॅम्प पार पडला.
यात ३१७ कामगारांना या कार्ड चे वाटप करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असंघटित कामगारांसाठी कल्याणकारी योजनांचा फायदा पोहोचवण्याच्या उद्देशाने प्रतिष्ठानने हा कार्यक्रम आयोजित केला होता.
याचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य जालिंदर वाकचौरे यांच्या हस्ते करण्यात आले.
टाकळी गावातील असंघटित कामगार महीला व पुरुष यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. शेतमजूर, महिला मजूर, गवंडी यांची संख्या मोठी दिसली.
सरकारने देशातील करोडो लोकांसाठी ही योजना राबवली असून इ श्रम कार्ड चे फायदे सामाजिक सुरक्षा लाभ, दोन लाख रुपयांचा विमा, मातृत्व लाभ, सरकारी कामात प्राधान्य असे आहेत.


यावेळी सुशील शेवाळे, आणासाहेब घुले, शांताराम शिंदे संतोष, तिकांडे, साहेबराव दातखिळे, अमोल घुले, राजेंद्र थोरात, विजय मेदगे, पंकज शेवाळे, बाळासाहेब दातखिळे, सूर्यभान नाईकवाडी, निलेश मोरे यांनी या कॅम्प साठी विशेष परिश्रम घेतले.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!