संगमनेरात कत्तलखान्यावर छापा ; ‘बुढ्ढी’ वर गुन्हा दाखल 

१ हजार ५०० किलो गोवंश मांस पकडले 

प्रतिनिधी —

संगमनेर शहरातील अवैध कत्तलखान्यात पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या पथकाने छापा टाकून १ हजार ५०० किलो गो वंश मासासह ३ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

विशेष म्हणजे शनिवारी भर दिवसा हा छापा टाकण्यात आला आहे. सातत्याने होणाऱ्या गोवंश हत्या आणि कत्तलखाने कायमस्वरूपी बंद करण्यासाठी कत्तलखानच्या परिसरात आता एक पोलीस चौकी सुरू करण्याची गरज असल्याची मागणी पुढे आली आहे.

उपअधीक्षक वाघचौरे यांना गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक राहुल डोके, पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे यांनी संगमनेर शहरातील गौसिया मशिदी शेजारी छपा घालून ही कारवाई केली आहे.

पोलिसांनी मदिना नगर मधील गल्ली नंबर एक मध्ये गोसिया मशीद शेजारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास छापा टाकला असता एका पत्र्याच्या शेड जवळ वाड्याच्या बाहेर गाडी क्रमांक एम एच 12 डी एस 17 68 या अल्टो गाडीमध्ये २०० किलो गोवंश मांस भरलेले आढळून आले. तर शेजारच्या वाड्यात तपासणी केली असता सुमारे १३०० किलो वजनाचे गोवंश मांस त्या ठिकाणी आढळून आले. पोलिसांनी त्याच ठिकाणी साहिल इजराइल कुरेशी (वय २० वर्षे रा. मदिना नगर) याला ताब्यात घेतले. त्यावेळी मूळ मालक हाश्मी नसीर कुरेशी उर्फ बुढ्ढी (वय ३२ वर्ष रा. मदिना नगर) असल्याचे समजले.

पोलिसांनी वरील सर्व मुद्देमाल जप्त करून साहिल इजराइल कुरेशी आणि हाश्मी नशीर कुरेशी उर्फ बुढ्ढी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस नाईक राहुल कचरू डोके यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास संगमनेर शहर पोलीस करत आहेत.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!