कत्तलीसाठी गोवंश घेऊन जाणारा जेरबंद !

संगमनेर पोलीस उपाधीक्षकांच्या पथकाची कारवाई 

प्रतिनिधी —

सध्या ऐरणीवर असलेल्या संगमनेरच्या गोवंश हत्या आणि कत्तलखाने पुन्हा एकदा गाजू लागले आहेत. गेल्या पंधरा दिवसात तीन ते चार वेळा या ठिकाणी छापे घालून गोवंश मांस व तस्करी करणारे पकडले आहेत. गुरुवारी रात्री पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या पथकाने एका वाहनातून २८ गोवंश वासरे कत्तली साठी घेऊन जाणाऱ्याला जेरबंद केले आहे.

उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना गुप्त खबऱ्या मार्फत माहिती मिळाली की एका पिकअप गाडीमध्ये कत्तली करिता गोवंश जनावरे आणलेली आहेत. ती संगमनेरच्या कत्तल खाण्यात दिली जाणार आहेत. ही गाडी संगमनेर शहरातील कोल्हेवाडी रोड या परिसरात आहे.

पथकाने सदर ठिकाणी पाहणी केली असता एक पांढऱ्य रंगाची गाडी दिसून आली. पिकअप गाडी नंबर एम एच 17 टी 87 35 या गाडीला अडविले असता त्या गाडीमध्ये कत्तलीसाठी निर्दयीपणे २८ गोवंश वासरे बांधण्यात आलेली आढळून आली. पथकाने सदर गाडी ताब्यात घेऊन वासरांची सुटका केली.

शोएब इस्माईल कुरेशी (वय २४, राहणार मदिना नगर, संगमनेर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. गोवंश वासरांसह ४ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. गोवंश वासरांना पांजरपोळ संस्थेच्या ताब्यात दिले आहे.

या कारवाईमध्ये पोलीस हवालदार श्याम हासे, अनिल कडलग, पोलीस नाईक राहुल डोके राहुल सारबंदे यांनी सहभाग घेतला. राहुल सारबंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!