सिंचनवाले… एकाच वेळी दोन-दोन घरं सांभाळणारे… दादांच्या लेखी योग्यतेचे !

आमदार रोहित पवार यांचा मंत्री अजित पवारांना सणसणीत टोला

प्रतिनिधी —

लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये हॉट समजल्या जाणाऱ्या जागांपैकी बारामती लोकसभा मतदारसंघातील जागा अतिशय हॉट आणि चर्चेची ठरली आहे. या मतदारसंघात रक्ताचे नाते एकमेकाविरुद्ध उभे ठाकले आहे. पवार विरुद्ध पवार अशी लढत संपूर्ण राज्यात प्रथमच पाहण्यास मिळत आहे. त्यामुळे एकमेकांवर अत्यंत टोकाचे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत.

बारामतीत दहशतीचं वातावरण असल्याच्या आईच्या वक्तव्यावर पत्रकारांनी प्रश्न विचारताच ‘योग्यतेच्या माणसांनी प्रश्न विचारला तर उत्तर देईन’ असं अजितदादा म्हणाले होते.

आमदार रोहित पवार यांनी मंत्री अजित पवार यांच्या त्या वक्तव्याचा जोरदार समाचार घेतला असून सोशल मीडियातून त्यांच्या वक्तव्याला खरपूस उत्तर दिले आहे. पवार यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की,

‘बरोबर आहे दादा तुमचं… स्वतःच्या अंगावर आलं की भलतीकडं ढकलण्याचा तुम्हाला भाजपाचा संगतगुण  लागलाय. आजवर तुमचा प्रचार केला त्यावेळी आम्ही योग्यतेचे होतो पण आज नाही.

मिर्चीवाले… महाराष्ट्र सदनवाले… सिंचनवाले… एकाच वेळी दोन-दोन घरं सांभाळणारे… आदिवासी विद्यार्थ्यांच्या दुधातली मलई खाणारे.. मागासवर्गीय विद्यार्थ्यांचं जेवणाचं ताट पळवणारे… हे मात्र तुमच्या लेखी ‘योग्यते’चे आहेत.

आमदार रोहित पवार यांनी केलेल्या या खरपूस टीकेची सर्वत्र चर्चा असून सोशल मीडियावर त्यांच्या या पोस्टला हजारो लाईक मिळत आहेत.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!