संगमनेरात कत्तलखान्यावर छापा !
२ हजार ९०० किलो गोवंश मांसासह २१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
नगर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई…
प्रतिनिधी —
संगमनेर शहरातील जमजम कॉलनी मधील कु – प्रसिद्ध कत्तलखान्यात आज पहाटे नगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून २ हजार ९०० किलो गो वंश महासासह २१ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या छाप्यात पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. या छाप्यानंतर संगमनेर शहरातील गोवंश हत्या आणि अवैध कत्तलखाने बंद नसल्याचे पुन्हा एकदा उघड झाले असून संगमनेर पोलिसांसह नगर जिल्हा पोलिसांवर हे अवैध धंदे बंद करता येत नसल्याची नामुष्की ओढावली आहे.

रेयान शेरखान पठाण (वय 21 वर्षे, रा. रहेमतनगर, जोर्वे रोड, संगमनेर), सलमान हारुन मणियार (वय 34 वर्षे, रा. मोमीनपुरा, छोटी मस्जिदजवळ, संगमनेर), राझिक अब्दुल रज्जाक शेख (वय 38 वर्षे, रा. अलकानगर, दिल्ली नाका, संगमनेर) अशी अटक केलेल्या तीन संशयीतांची नावे आहेत.

गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त बातमीदारामार्फत जमजम कॉलनी, संगमनेर या ठिकाणी गोवंश जनावरांची कत्तल करण्यात येत आहे. अशी माहिती मिळाली. पहाटे या ठिकाणी छापा टाकून वरील तिघांसह मुद्देमाल हस्तगत केला आहे.
पकडण्यात आलेल्या संशयीतांकडून…
1) 6 लाख रुपये किमतीची पिकअप क्रमांक एम.एच. 17 बी.डी. 4182 व त्यामध्ये 4,50,000/- रुपये किमतीचे 1500 किलो गोमांस,
2) 6 लाख रुपये किमतीची पिकअप क्रमांक एम.एच. 11 ए. जी. 3246 व त्यामध्ये 1400 किलो गोमांस,
3) 2000/- रुपये किमतीचा एक सत्तुर, दोन सुरे व एक कुऱ्हाड असा एकुण 20,72,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलीस हवालदार सचिन दत्तात्रय अडबल (स्थानिक गुन्हे शाखा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास संगमनेर शहर पोलीस करीत आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलीस अंमलदार सचिन अडबल, बापुसाहेब फोलाणे, गणेश भिंगारदे, संतोष लोढे, अतुल लोटके, संतोष खैरे, रणजित जाधव, रविंद्र घुंगासे, सागर ससाणे, बाळासाहेब गुंजाळ, आकाश काळे, विशाल तनपुरे, उमाकांत गावडे या पथकाने ही कारवाई केली.

