महिलेची विनयभंगाची तर दुकान चालकाची जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार !

संगमनेरात दोघांवरही गुन्हा दाखल

प्रतिनिधी —

संगमनेर शहरात रोज काही ना काही घटना घडत असून त्यावरून पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल होत आहेत. आता शहरातील एका महिलेने येथील एका सलूनमध्ये आपला विनयभंग करण्यात आल्याची तक्रार केली तर सलून चालकाने सदर महिलेने आपल्या दुकानात गोंधळ घालून धमकी देत जातीवाचक शिवीगाळ केली असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली आहे. शहर पोलिसांनी विनयभंगाचा आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.

संगमनेर शहरामध्ये जावेद हबीब सलून या दुकानाची फ्रेंचाईजी आहे. या दुकानांमध्ये एक महिला स्वतःचे केस वॉश करण्यासाठी गेली होती. सदर महिलेला तेथील स्टाफ मध्ये काम करणाऱ्या एका शाकिब नावाच्या मुस्लिम कर्मचाऱ्याने हेअर वॉशच्या वेळी मॅडम तुम्ही आज खूप सुंदर दिसता, तुमच्या शरीरावर आणखी कुठे कुठे टॅटू आहेत, हे पाहायला आवडेल. मी तुमची चांगली मसाज करून देईल असे बोलत महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले म्हणून सदर महिलेने त्याच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने शाकिब (पूर्ण नाव माहित नाही) याच्यावर विनयभंगाचा गुन्हा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

तर दुसरीकडे सदर महिलेचे स्वतःचे ब्युटी पार्लरचे दुकान असून देखील ही महिला आमच्या दुकानात येते. शिवाय ती प्रत्येक वेळी भांडण करत आली आहे. आजपर्यंत तीन-चार वेळा अशी घटना घडली आहे. सदर महिलेने आमच्या दुकानात आरडाओरडा करीत आम्ही मारवाडी आहोत. आमचे धंदे असतात. तुम्ही महारडे हेअर सलूनचे धंदे करायला लागले काय ? दुकान कसे काय चालवता तेच पाहते. मुलांना येथे बोलवून तुमचे दुकान फोडून बंद करून टाकेल. लांडे असेच असतात. या लांड्यांना कामावर का ठेवता. तुमची लायकी विसरले काय ? तुम्हाला तुमची लायकी दाखवते. अशी धमकी देत हाताने मारहाण करत दुकानात गोंधळ घालून. आम्हाला जातीवाचक शिवीगाळ केली आहे. अशी फिर्याद दुकान चालक आशिष सुनील महिरे, (हल्ली राहणार गणेश नगर, संगमनेर  मूळ राहणार शिवाजीनगर, सातपूर, नाशिक) यांनी दिल्याने सदर महिला कृष्णा सारडा हिच्या विरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार (ॲट्रॉसिटी) संगमनेर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!