गाथा पुनरुत्थान दिवस होणार साजरा !
इंद्रायणीत उभे राहून गाथेचे वाचन – गाथा परिवाराचा उपक्रम

प्रतिनिधी —
तुकाराम महाराजांची गाथा म्हणजे बहुजनांचे विचारधन ! गाथा म्हणजे जीवनदर्शन !! गाथा तरली, गाथेचं पुनरुत्थान झालं हे आपल्या दृष्टीने फार महत्वाचं आहे. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांची गाथा इंद्रायणीच्या डोहात बुडवण्यात आली. त्यानंतर ही गाथा पुन्हा पाण्यातून वर आली. ज्या दिवशी ही गाथा इंद्रायणीमध्ये तरली तो दिवस ‘गाथा पुनरुत्थान दिवस’ म्हणून साजरा करण्याचे आयोजन ‘गाथा परिवाराने केले आहे.
दरवर्षी या उपक्रमाचे आयोजन केले जाणार आहे अशी माहिती गाथा परिवारचे अध्यक्ष हभप उल्हास पाटील यांनी दिली आहे.

‘इंद्रायणीत उभे राहून करूया गाथेचे वाचन’ असे आवाहन करत चैत्र शुद्ध तृतीया, दिनांक ११ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ८.३० वाजता, गाथा मंदिरा शेजारी, इंद्रायणी घाटावर, देहू येथे हा कार्यक्रम साजरा केला जाणार आहे. यावेळी इंद्रायणी नदीच्या पात्रात उभे राहून सामुहिक गाथा वाचन करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे हे उपस्थित राहणार आहेत. तर देहुगाव येथील विठ्ठल रुक्मिणी देवस्थानचे अध्यक्ष हभप पुरुषोत्तम महाराज मोरे, प्रशांत उर्फ बाबासाहेब भालेकर, पांडुरंग महाराज घुले, बाळासाहेब काशीद, नगराध्यक्षा पूजाताई दिवटे, उपनगराध्यक्ष सुधीर काळोखे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

या उपक्रमासाठी आणि गाथा वाचन करण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन गाथा परिवाराचे अध्यक्ष व निमंत्रक उल्हास पाटील, गाथा मूर्ती तुकाराम महाराज घाडगे, मधुकर कंद पाटील, रवींद्र कंद, सूर्यकांत शिवले, आबासाहेब गव्हाणे, बाळासाहेब सातव, सिताराम बाजारे, ॲड. आर.बी. शरमाळे, हभप विजय महाराज भोईरकर, राहुल पोकळे, किशोर ढमाले, प्रतिमा परदेशी, अभिजीत घोरपडे, उत्तम कुमार इंदोरी, विलास बुवा, प्रभाकर भोसले, किशोर कडू, सुधीर मेमाणे, गणेश कोरे, सत्यराज यादव, अविनाश देवाळकर, ममता झांजुर्णे, गीतांजली देवाळकर यांनी ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ अनुभवण्यासाठी या असे आवाहन केले आहे.

