जयंती महोत्सवानिमित्त आदेश बांदेकर मंगळवारी संगमनेरात !

प्रतिनिधी —

स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व हरितक्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सवानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये मंगळवार दिनांक 9 जानेवारी 2024 रोजी रात्री 7 वाजता ‘होम मिनिस्टर फेम’ आदेश बांदेकर यांचा खेळ मांडीयेला कार्यक्रम जाणता राजा मैदानावर होणार आहे.

आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली जयंती महोत्सव समितीच्या वतीने जाणता राजा मैदानावर जय्यत तयारी करण्यात आली असून काल पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या दिमाखदार पद्धतीने संपन्न झाला. यावेळी कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री विविध मंत्री यांसह महाराष्ट्रातील माजी मंत्री, आमदार खासदार व संपूर्ण महाविकास आघाडीतील विविध मान्यवरांची मोठी उपस्थिती हे वैशिष्ट्य ठरले.

आमदार बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली संयोजन समितीने अत्यंत उत्कृष्ट केलेले नियोजन, आलेल्या सर्व पाहुण्यांचे आदरतिथं, जर्मन हंगर पद्धतीचा भव्य शानदार मंडप, सुसज्ज बैठक व्यवस्था, साऊंड सिस्टिम, एलईडी वॉल, पार्किंग व्यवस्था, आणि उत्कृष्ट नियोजनामुळे हा कार्यक्रम संस्करणीय ठरला.

या कार्यक्रमासाठी राज्यभरातील मान्यवरांच्या उपस्थिती सह अहमदनगर जिल्हा व संगमनेर तालुक्यातील गावागावा मधून नागरिक युवक कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

मंगळवारी जाणता राजा मैदानावर खास महिलांकरता होम मिनिस्टर फेम आदेश बांदेकर यांचा “खेळ मांडला” हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. महिलांसाठी खास बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.

तरी या कार्यक्रमासाठी संगमनेर शहर व तालुक्यातील नागरिक युवक व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन निमंत्रक आमदार सत्यजित तांबे व डॉ. जयश्री थोरात, जयंती महोत्सव समिती व अमृत उद्योग समूहाच्या वतीने करण्यात आले आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!