सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जन्मशताब्दीनिमित्त 

१ जाने ते ६ जानेवारी २०२४ या दरम्यान विचार प्रबोधन जागर !

प्रतिनिधी — 

स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने त्यांच्या विचाराचे जागर करण्यासाठी तालुक्यात विविध शाळांमधून १ जानेवारी ते ६ जानेवारी या काळात प्रबोधन विचार जागर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती समन्वयक प्रा. बाबा खरात यांनी दिली आहे.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सहकारातून समृद्धीकडे ही चळवळ खऱ्या अर्थाने तालुक्यात राबवून तालुक्यात विकासाची गंगा आणली. त्यांचे हे जन्मशताब्दी वर्ष असून या निमित्त आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

विचार  जागर मधून तालुक्यातील विविध विद्यालय, महाविद्यालय यांना सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचे विचार माहीत व्हावे यासाठी विचार प्रबोधन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून लोकगीतातून लोकशिक्षणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. यावेळी विविध लोकगीतांच्या माध्यमातून भाऊसाहेब थोरात यांचे कार्य विद्यार्थ्यांना सांगण्यात येणार आहे.

ही विचार प्रबोधन जागर यात्रा सोमवार दिनांक १ जानेवारी २०२४ रोजी अमृतवाहिनी कॉलेज, एसएमबीटी दंत महाविद्यालय व सह्याद्री कनिष्ठ महाविद्यालय निमोण, पारेगाव खुर्द येथे जाणार आहे. त्यानंतर मंगळवारी २ जानेवारी रोजी तळेगाव दिघे येथील लोकनेते बाळासाहेब थोरात महाविद्यालय न्यू इंग्लिश स्कूल तसेच चिंचोली गुरव, देवकवठे,नान्नज दुमाला, निळवंडे, वडगाव पान येथे जाणार आहे. बुधवार दिनांक ३ जानेवारी रोजी सुकेवाडी, कुरण कोल्हेवाडी, जोवें, रहिमपूर, कनोली शेडगाव, पिंपरणे, कोळवाडे या गावात प्रबोधन केले जाणार आहे. शुक्रवार दिनांक ५ जानेवारी रोजी संगमनेर खुर्द, निमज, नांदुरी दुमाला, निमगाव टेंभी, वरुडी पठार, आंबी खालसा, पिंपळगाव माथा येथेही प्रबोधन जागर यात्रा जाणार आहे. व शेवटच्या दिवशी म्हणजेच शनिवार दिनांक ६ जानेवारी रोजी कासारा दुमाला, मंगळापुर, गुंजाळवाडी, राजापूर, जवळे कडलग या गावांमधून विचार प्रबोधन जागर यात्रा जाणार आहे.

तरी या विचार प्रबोधन जागर यात्रेत विविध गावांमधील कार्यकर्ते युवक पदाधिकारी शालेय विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन अमृत उद्योग समूह व जयंती महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!