कत्तलीसाठी कोंडलेल्या २५ गोवंश जनावरांची सुटका
प्रतिनिधि —
संगमनेर शहरातील जमजम कॉलनीतील कत्तलखांन्यात कत्तलीसाठी आलेल्या २५ गोवंश जनावरांची संगमनेर शहर पोलिसांच्या पथकाने मुक्तता केली आहे
याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की, शहर पोलिसांना खबर लागली की येथील कुप्रसिद्ध कत्तलखान्या मध्ये कत्तल करण्यासाठी काही जनावरे डांबून ठेवलेली आहेत. त्यानुसार संगमनेर शहरातील रहेमतनगर जवळ म्हसोबा मंदिरासमोरील मोकळ्या जागेतील काटवनात कत्तलीसाठी गोवांश जनावरे निर्दयपणे बांधून ठेवल्याचे आढळून आले आली. पोलिसांच्या पथकाने छापा टाकला असता कत्तलीचा उद्देशाने १ लाख ७० हजार रुपये किंमतीच्या १७ गायी,
३० हजार रुपये किंमतीचे २ बैल, २० हजार रुपये किंमतीचे ४ वासरे, २० हजार रुपये किंमतीचे २ रेडे असा एकूण २ लाख ४० हजार रुपये किमतीची बांधून ठेवलेली एकूण २५ जनावरे पोलिसांनी ताब्यात घेतली.
पो. कॉ. विवेक जाधव यांनी शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादी वरुन शहर पोलिसांनी अज्ञात इसमाच्या विरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्या नुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शना खाली सुरू आहे.
