बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला दहा वर्षांची शिक्षा…
संगमनेर अतिरिक्त सह जिल्हा न्यायालयाचा निकाल
प्रतिनिधी —
बालिकेच्या असहायतेचा फायदा घेत आणि तिला पैशाचे आमिष दाखवत तिच्यावर अमानुष अत्याचार करून बलात्कार करणार्या नराधमास संगमनेर जिल्हा सत्र न्यायालयाने दहा वर्षाची शिक्षा ठोठावली आहे.
संगमनेर तालुक्यातील पठार भागात घडलेल्या या अमानुष घटनेचा निकाल लागला असून अतिरिक्त सह जिल्हा न्यायाधीश आर.आर. कदम यांनी ही शिक्षा ठोठावली आहे. महादु कृष्णा ढेरंगे (वय ६३) रा. आंबी दुमाला, ता. संगमनेर असे शिक्षा झालेल्या या नराधमाचे नाव आहे.
सन २०१८ मध्ये घारगाव पोलीस स्टेशनला आठ वर्षे वयाच्या मुलीवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याच्या प्रकरणी आरोपी ढेरंगे याला ही १० वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे.
न्यायालयाने आरोपीस भारतीय दंड विधान प्रमाणे १० वर्षे शिक्षा व दोन हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन मैने कैद अशी शिक्षा सुनावली आहे.
या महत्त्वपूर्ण केसमध्ये सरकारतर्फे ५ साक्षीदार तपासण्यात आले सरकारी वकील म्हणून बी. जी. कोल्हे यांनी काम पाहिले. सरकारी वकिलांचा युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरून वरील प्रमाणे आरोपीस शिक्षा ठोठावली आहे.
सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एन आर. इनामदार यांनी केला होता. या केस मध्ये पैरवी अधिकारी म्हणून सहाय्यक फौजदार एस.डी. टकले एस.डी. सरोदे पोलीस हवालदार पी.डी. डावरे, महिला पोलीस कॉन्स्टेबल नाईकवाडी, महिला पोलीस कॉन्स्टेबल डी.वाय. दवंगे एस.बी. डोंगरे, पोलीस कॉन्स्टेबल व्ही.ए. देशमुख यांनी कामकाजास मदत केली.
