संगमनेर शहर पोलीस ठाण्यात मोफत दंत तपासणी व एक्स रे शिबीर संपन्न !
प्रतिनिधी —
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सध्या सुरु आहे. यानिमीत्ताने देशभरात सरकारी विभागात विवीध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या संकल्पनेतून शहर पोलीस ठाण्यात दंत चिकीत्सक डॉ. किशोर पाटील यांच्या माध्यमातून मोफत दंत तपासणी व एक्स रे शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

शहर पोलीस स्टेशन व हेल्पिंग हँण्डस् यूथ ऑर्गनायझेशनच्या सहकार्यातून हा बुधवारी पारशी नववर्षदिनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शहर पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब यादव यांनी दिली.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सोहळ्यानिमीत्त सर्वत्र ‘मेरी माटी मेरा देश’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्यातदेखील निरीक्षक मथुरे यांनी या अंतर्गत विविध उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. याचाच एक भाग दंत चिकीत्सा शिबीर होते. शिबीरात डॉ. किशोर पाटील यांनी रुग्णांची तपासणी केली. त्यांना रमेश फिरके यांनी सहाय्य केले. शिबीरासाठी आवश्यक औषधे स्वामी समर्थ मेडीकलच्यावतीने पुरविण्यात आली होती. तर हेल्पिंग हँण्डस् यूथचे भूषण नरवडे यांनी शिबिराची व्यवस्था बघितली.

