गोवंश कत्तल करणाऱ्या आरोपींना ३ वर्षे हद्दपार करण्याची बजरंग दलाची मागणी !

प्रतिनिधी —

गोवंश संदर्भात गुन्हे दाखल असलेल्या आरोपींना मुंबई पोलीस अधिनियम कलवान्वये व मोक्का कायदा अंतर्गत त्यांच्यावर ३ वर्षे तडीपार आदेश होणेबाबतचे निवेदन उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांना देण्यात आले.

संगमनेर शहर व परिसरात दररोज शेकडो गाईंची कत्तल होत असून यामध्ये कत्तल करणारे तेच- तेच आरोपी असून त्यांच्यावर संघटित गुन्हेगारी करणे, मुंबई पोलीस अधिनियम कलमान्वये व मोक्का कायद्याअंतर्गत ३ वर्षे तडीपारच्या आदेश होणे गरजेचे असल्याचे निवेदन उपविभागीय अधिकारी संगमनेर भाग, संगमनेर यांना देण्यात आले.

गोवंश संदर्भातील सर्व FIR उपविभागीय अधिकारी यांना यावेळी सादर केल्या आहेत. ३ वर्षे तडीपारचे आदेश झाले तर आरोपींना कायद्याचा धाक बसेल व काही वर्षांसाठी अवैध कत्तलखाने बंद होतील. अशी अपेक्षा संघटनेकडून करण्यात आली.

यावेळी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा सहमंत्री विशाल वाकचौरे व गोपाल राठी, विहिंप धर्म प्रसार जिल्हा प्रमुख प्रशांत बेल्हेकर, बजरंग दलाचे विभाग संयोजक सचिन कानकाटे, प्रखंड संयोजक कुलदीप ठाकूर, शहर संयोजक शुभम कपिले, ओंकार भालेराव, अनिकेत पवार, दीपक मेहत्रे आदींची उपस्थिती होती.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!