निमगाव ते पेमगिरी रस्त्याच्या कामाचा दर्जा सुधारून पावसाळ्याच्या आत काम पूर्ण करा — स्वराज्य संघटना

प्रतिनिधी —

संगमनेर तालुक्यातील पर्यटन स्थळांपैकी एक स्वराज्य संकल्प भूमी पेमगिरीकडे जाणाऱ्या निमगाव ते पेमगिरी रस्त्याची पूर्णपणे दुरवस्था झाली असून हा रस्ता लवकरात लवकर पूर्णपणे व्यवस्थित करावा आणि पावसाळ्याआधी हे काम पूर्ण करावे अशी मागणी येथील स्वराज्य संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग संगमनेर यांना निवेदन देण्यात आले आहे.

निमगाव खुर्द ते सावरचोळ रस्ता रूंदी माझे काम निकृष्ट दर्जाचे चालू चालू आहे रस्त्याच्या कामाचा दर्जा व्यवस्थित नसल्याने रस्ता पुन्हा लवकर खराब होईल आणि वाहतुकीस अडचणीचा ठरेल त्यामुळे रस्त्याचे काम करताना त्याचा दर्जा उत्कृष्ट असावा आणि पावसाळ्यापूर्वीच हे काम पूर्ण करावे अशी मागणी निवेदनात करण्यात आलेली आहे.

खांडगाव ते कोठे फाटा काम पूर्ण झाले असुन निमगाव बुद्रुक ते पेमगिरी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यात आता पावसाळा जवळ आला आहे. पेमगिरी पर्यटन स्थळ असल्याने अनेक पर्यटक या ठिकाणी येत असतात व त्यांना अत्यंत खराब रस्त्यामुळे मनस्ताप होत असतो. या रस्त्यात काही ठिकाणी साईड गटार काढण्याची मागणी देखील या वेळी करण्यात आली.

बऱ्याच ठिकाणी रस्त्याचे काम हे निकृष्ट दर्जाचे आहे हे काम त्वरित थांबून उत्कृष्ट दर्जाचे काम करावे अन्यथा सर्व पक्षीय जन आंदोलन उभे करून रस्ता रोको करण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आले आहे हे निवेदन इंजिनियर आशिष कानवडे यांच्या नेतृत्वात सार्वजनिक बांधकाम विभाग उपकार्यकारी अभियंता यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संदिप राऊत, संकेत कोल्हे, सुरेश डुबे, प्रवीण गुळवे, चैतन्य डुबे आदी उपस्थितीत होते.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!