संगमनेरात प्रचंड भगवा मोर्चा !

शहरवासीयांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळला…

(सर्व छायाचित्रे काशिनाथ गोसावी, संगमनेर)

प्रतिनिधी —

सकल हिंदू समाजाच्या वतीने संगमनेर मध्ये आयोजित केलेल्या ‘भगवा मोर्चा’ ला संगमनेर शहरासह ग्रामीण भागातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. हजारोंच्या संख्येने तरुण आणि नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते. भव्य असे मोर्चाने संगमनेर शहराचे वातावरण ‘भगवे’ करून टाकण्यात आले होते. सकाळी लाल बहादूर शास्त्री चौकातून सुरू झालेला मोर्चाची सांगता नवीन नगर रोडवरील प्रशासकीय इमारत प्रांत अधिकारी कार्यालय समोर सभेच्या रूपाने झाली.

महाराष्ट्रात हिंदूंच्या सणांवर होणारे हल्ले, दिल्लीत साक्षीची जिहादींकडून चाकूने अनेक वार करून केलेली हत्या, अवैध गोवंश कत्तलखाने व जोर्वे (संगमनेर)  गावातील ८ हिंदू तरुणांवर तलवारीने झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

प्रशासन आणि मोर्चाचे आयोजक यांच्यात मोर्चा होईपर्यंत सातत्याने समन्वय आणि नियोजनाच्या बैठका संदर्भात झालेल्या विविध चर्चांमुळे मोर्चा कुठलेही गालबोट न लागता शांततेत पार पडला. संगमनेरच्या पोलीस प्रशासनाने यावेळी चोख भूमिका बजावली आहे.

संगमनेर नगरपालिका, लालबहादूर शास्त्री चौक ते बाजारपेठ, तेलीखुंट, सय्यद बाबा चौक, मेन रोड, चावडी, अशोक चौक, मोमीनपुरा चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, बस स्थानक ते नवीन नगर रोडवरील प्रशासकीय इमारतीतील प्रांत कार्यालय अशा मार्गाने हा मोर्चा प्रांत कार्यालयावर येऊन धडकला. त्यानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. आज संगमनेर शहरवासी यांनी संगमनेर बंद उस्फूर्तपणे पाळला होता.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!