राजूर पोलीस स्टेशनचा कारभार महिला पोलिसांच्या हाती !
प्रतिनिधी —
जागतिक महिला दिनानिमित्त राजूर पोलीस स्टेशनचा कारभार महिला पोलिसांच्या हाती देऊन पोलीस निरीक्षक गणेश इंगळे यांनी महिलांचा आगळावेगळा सन्मान केला.

या वेळी महिला पोलीस कॉन्स्टेबल यांचा फेटा, शाल देऊन सत्कार करण्यात आला. महिला पोलिस एस. बी. शिंदे, एस. ए. लोखंडे, एस.एस. वायकर, होमगार्ड कसाब आदी उपस्थित होत्या. राजूर पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस अंमलदार यांच्यावर पोलीस स्टेशनचा कारभार एक दिवसासाठी सोपविण्यात आला.

या वेळी राजूर पोलीस स्टेशनला ठाणे अंमलदार म्हणून महिला पो.हेड कॉ. एस. बी .शिंदे यांनी काम पाहिले. तसेच वायरलेस ड्युटी कामी पो.नाईक वायकर, सी.सी.टी.एन.एस ड्युटी कामी चव्हाण, बारनिशी टपाल आवक जावक ड्युटी कामी चोखंडे यांनी कर्तव्य बजावले.

तसेच पत्रकारांच्यावतीने महिला पोलिसांचा सत्कार करण्यात आला. राजूर पोलिस स्टेशन हद्दीतील कॉलेज, शाळा याठिकाणी महिला अंमलदार यांनी भेटी देऊन विद्यार्थीनींना कायदेविषयक मार्गदर्शन केले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक शेख, अशोक गाढे, विजय फटांगरे, वर्पे, ढाकणे आदी उपस्थित होते.

