वडील व मुलीची गळफास घेत आत्महत्या.

उंबरी बाळापूर येथिल घटना ;  कामासाठी आले होते नादूंर खंदारमाळ येथील कुटुंब.

प्रतिनिधि 

संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर येथे शेतातील घरात नामदेव बबन भुतांबरे (वय – ४०) व मनिषा नामदेव भुतांबरे (वय – १४) रा. नादूंर खंदरमाळ तरसेवाडी, ता. संगमनेर, हल्ली रा. बाळापूर या वडील व मुलीनी शनिवारी दुपारी गळफास घेत आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना उघडकीस आली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, भुतांबरे कुटुंब हे कामानिमित्त उंबरी बाळापूर येथे आले होते. शनिवारी दुपारी बाळापूर शिवारातील पढंरीनाथ दत्तु सातपुते याच्यां गट नंबर – १७० मधील घरामध्ये नामदेव भुतांबरे व मनिषा भुतांबरे या दोघानी तारीच्या साह्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली असून बाळापूरच्या कामगार पोलीस पाटील वैशाली मैड यानी आश्वी पोलीसाना याबाबत खबर दिली. यानंतर पोलीस निरीक्षक सुभाष भोये व त्याच्या सहकाऱ्यानी घटनास्थळी धाव घेत दोघाचे मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी संगमनेर येथिल रुग्णालयात पाठवल्याची माहिती मिळाली असून यावेळी सरपंच किरण भुसाळ, उपसरपंच नानासाहेब उंबरकर, अशोक भुसाळ, अनिल भुसाळ आदिसह परिसरातील नागरीक घटनास्थळी उपस्थित होते.

दरम्यान वडील व मुलीने आत्महत्या का केली याचे कारण स्पष्ट झाले नसून आश्वी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोदं करण्यात आली असून पोलीस निरीक्षक सुभाष भोये याच्यां मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलिस  हवालदार शिदें हे करत आहेत.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!