समलैंगिकतेच्या उंबरठ्यावर संगमनेर !

 

संगमनेरातील एका घटनेमुळे संगमनेर मध्ये निदान २०० ते ३०० व्यक्तीं शिवाय कदाचित आजूबाजूच्या तालुक्यातील सुद्धा या एकमेकांच्या लैंगिक आकर्षणात समलैंगिक संबंधात असल्याची माहिती समजली असून ही माहिती कधी उघड होईल हे मात्र सांगता येत नाही. कदाचित असे संबंध असणाऱ्या व्यक्तींकडूनच ही माहिती समाजासमोर येईल असे सध्या तरी वाटते. मात्र अशा माहिती लपवून ठेवल्याने त्यातून समाजाचेच नुकसान होईल असाही एक सुर आहे. मात्र असे समलैंगिक संबंध असणाऱ्या स्त्री-पुरुषांचे सामाजिक नुकसान होऊ नये, त्यांना शारीरिक इजा पोहोचू नये यासाठी मानवतेच्या दृष्टिकोनातून या प्रकाराकडे पाहिले जावे असे देखील म्हटले जाते.

 

विशेष प्रतिनिधी —

एकाच लिंगाच्या व्यक्तींना असणारे परस्पराविषयीचब लैंगिक आकर्षण आणि त्यातून निर्माण होणारे संबंध यामुळे एकेकाळी जगात आश्चर्याबरोबर सामाजिक आणि नैतिकतेचा हादरा मानवाला बसला होता.

नंतर याचे प्रमाण सातत्याने वाढत गेल्याने हळूहळू जगातील काही देशांमध्ये या संबंधांना मान्यताही देण्यात आली. जगात असणाऱ्या विविध धर्मांमध्ये देखील अशा संबंधांना विरोध असल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. धर्मामध्ये देखील आणि धर्मग्रंथातून अशा सर्वांना शिक्षा देखील असल्याची माहिती मिळते.

हा सर्व विषय सध्या चव्हाट्यावर येण्याचे कारण म्हणजे आता समलैंगिकता संगमनेरच्या उंबरठ्यावर पोहोचली असून समलैंगिक संबंध ठेवणाऱ्यांची संख्या संगमनेरात वाढती असल्याची माहिती एका घटनेतून उघडकीस येण्याची शक्यता आहे. मात्र ही माहिती संबंधित असणाऱ्या यंत्रणेकडून दाबण्यात येत असून विनाकारण वेगवेगळ्या चर्चांना उधान येत आहे.

मात्र या समलैंगिकतेच्या संबंधांमुळे एकमेकांच्या मनामध्ये कटूता निर्माण होऊन त्यातून गुन्हेगारी स्वरुपाच्या घटना देखील होऊ लागल्याने समलैंगिकता आता पुन्हा सामाजिक कसोटीवर तपासली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (निदान संगमनेरात तरी)

संगमनेरातील एका घटनेमुळे संगमनेर मध्ये निदान २०० ते ३०० व्यक्तीं शिवाय कदाचित आजूबाजूच्या तालुक्यातील सुद्धा या एकमेकांच्या लैंगिक आकर्षणात समलैंगिक संबंधात असल्याची माहिती समजली असून ही माहिती कधी उघड होईल हे मात्र सांगता येत नाही. कदाचित असे संबंध असणाऱ्या व्यक्तींकडूनच ही माहिती समाजासमोर येईल असे सध्या तरी वाटते. मात्र अशा माहिती लपवून ठेवल्याने त्यातून समाजाचेच नुकसान होईल असाही एक सुर आहे.

पुरुष आणि स्त्री समलैंगिकांसाठी मराठीत वेगवेगळे शब्द नाहीत. इंग्लिशमधे समलैंगिक स्त्रियांना ‘लेस्बिअन’ (Lesbian) व समलैंगिक पुरुषांना ‘गे’ (Gay) म्हटले जाते. स्वतःला समलैंगिक म्हणवून घेणाऱ्यांचे आणि समलैंगिक संबंधांचा अनुभव घेणाऱ्या लोकांचे प्रमाणाचा अंदाज घेणे कठीण जाते. विषमलैंगिक लोकांकडून होणारा त्रास आणि लोकांना समलैंगिकांच्या वाटणाऱ्या भीतीपोटी अनेक समलैंगिक स्वतःची लैंगिकता उघड करत नाहीत. समाजातून आपल्याला व आपल्या कुटुंबियांना देखील अडचण निर्माण होऊ शकते कुटुंबाची बदनामी होऊ शकतील अशी भीती देखील समलैंगिक व्यक्तींमध्ये असल्याचे आढळून आले आहे.

साधारण  १९८० च्या दशकापर्यंत बऱ्याच पाश्चिमात्य देशांमध्ये समलैंगिकता कायद्याच्या दृष्टीने गुन्ह्याच्या यादीतून काढून टाकण्यात आलेली होती. काही देशांमध्ये समलिंगी विवाहास कायदेशीर मान्यता आहे. काही देशांमध्ये विशेषतः युरोपियन देशात  कायदेशीर मान्यता नसली तरी वैवाहिक जोडप्यांसारखे हक्क दिले गेले आहेत.

अनेक आशियाई, आखाती देशांमध्ये समलैंगिकता अजूनही गुन्हा आहे. सहा देशांमध्ये समलैंगिक समागम करणे हा जन्मठेप-पात्र गुन्हा आहे; १० देशांत तर समलैंगिकतेस मृत्युदंडाची शिक्षा आहे.

भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने सन २०१८ मधे भारतीय दंडविधान संहितेचे ३७७ हे कलम आता एकमेकांच्या संमतीने खाजगीत होणाऱ्या समलिंगी लैंगित संबंधानां लागू करता येणार नाही असा निर्णय दिला. ह्या कलमा अंतर्गत आता फक्त पौढ नसलेल्या व्यक्तिंशी केलेल्या लैंगिक क्रियाच गुन्हा ठरतील.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!