नंबर प्लेट नसलेल्या पिकअप जीप मधून वाळू तस्करी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी पकडले !
प्रतिनिधी —
नंबर प्लेट नसलेल्या पिकअप जीप मधून वाळू तस्करी करणाऱ्या दोघांना संगमनेर तालुका पोलिसांनी पकडले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सचिन खेमनर आणि मयूर माळी (रा. ओझर खुर्द, तालुका संगमनेर) अशी दोघा वाळू तस्करांची नावे आहेत.

ओझर बुद्रुक गावातील कमानीजवळ शनिवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास एका पांढऱ्या रंगाच्या नंबर प्लेट नसलेल्या टाटा कंपनीच्या पिकअप जीप गाडी मधून वाळू तस्करी करत असल्याचे पोलिसांना आढळून आले. ही गाडी पकडली असता गाडीमध्ये वरील दोघेजण सापडले एक जण गाडी सोडून पळून गेला असल्याची माहिती समजली आहे.

पोलीस कॉन्स्टेबल बाबासाहेब केशव शिरसाट यांनी यासंदर्भात फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार जे.ए. सय्यद हे करत आहेत. पोलिसांनी वाळू सह एक लाख दोन हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

