संगमनेर पोलिसांनी ९०० किलो गोवंश मांस पकडले !

अवैध गोवंश हत्यांबाबत सध्या भाजपचे मौन !

 

 

  • कत्तलखान्यांबाबत भाजपचे मौन !

  • संगमनेर शहरात होणाऱ्या गोवंश हत्या, गायींची कत्तल यावरून पूर्वी आंदोलन करणारे, पोलीस अधिकाऱ्यांना धारेवर धरणारे, पोलीस अधिकाऱ्यांना सामाजिक उपक्रमात सहभाग घेऊ न देणारे, निषेध व्यक्त करणारे भाजपचे सर्व पदाधिकारी नवीन सरकार आल्यापासून संगमनेरच्या अवैधकत्तलखान्यांबाबत गुळणी धरून बसले आहेत. याबाबत कोणताही पदाधिकारी बोलताना दिसत नाही. 

  • कत्तलखान्यांमध्ये आणि गोवंश गायींच्या रक्ताने हात माखलेल्या पोलीस अधिकाऱ्यांला धार्मिक उत्सवात सहभागी होऊ देणार नाही असा पवित्र घेणारे देखील आता मौन धरून बसले आहेत. दुसऱ्या पक्षाचे सरकार सत्तेवर असल्यावर आंदोलन करणाऱ्यांनी आता त्यांच्या स्वतःच्या पक्षाचे सरकार सत्तेत आहे. गृहमंत्री भाजपचे आहेत. त्यामुळे सर्वात प्रथम संगमनेर शहरातील आणि तालुक्यातील गोवंश हत्या करणारे कत्तलखाने या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या सरकारकडून बंद करून दाखवावेत असे आव्हान आता त्यांच्यासमोर आहे.

 

प्रतिनिधी —

संगमनेर शहरातील अवैध कत्तलखाने सुरूच असल्याचे पुन्हा एकदा अवघड झाले असून कत्तल केलेले ९०० किलो गोवंश मांस वाहतूक करताना संगमनेर शहर पोलिसांनी पकडले आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. ९०० किलो गोवंश मांसासह पोलिसांनी तीन ३ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

संगमनेर शहर हद्दीतील अवैध कत्तलखाने बंद करणे हा पोलिसांना डोकेदुखीचा विषय ठरला आहे. एकीकडे दरोडे, घरफोड्या, चोऱ्यांनी त्रस्त असलेले संगमनेर पोलीस शहरातील अवैध धंद्यांनी देखील उघडे पडले आहेत.

संपूर्ण महाराष्ट्रात कु प्रसिद्ध असणारे संगमनेरचे हे अवैध कत्तलखाने बंद होण्याचे नाव घेत नाहीत. नाशिकचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या पथकासह, एलसीबी इतर विशेष पथके आणि संगमनेर शहर पोलिसांनी छापे टाकून देखील संगमनेरातील गोवंश हत्या थांबत नाहीत. या मागचे नेमके कारण काय हे सर्वश्रुत आहे.

अवैध कत्तलखान्यांमधून होणारी गोवंश मांस तस्करी सातत्याने चालू असते. आठवड्यातून किंवा पंधरा दिवसातून एखादी कारवाई करून आम्ही कारवाई करत आहोत असे पोलीस रेकॉर्ड तयार करत असतात. आरोपींवर पोलिसांचा वचक नाही. कितीही गुन्हे दाखल करा आम्ही गोवंश हत्या करणारच, अवैध धंदे करणारच अशी या गुन्हेगारांची भूमिका आहे. त्यामुळे संगमनेरातील गो हत्या थांबलेल्या नाहीत.

आज पहाटे संगमनेर खुर्द शिवारात एका पांढऱ्या रंगाच्या महिंद्र पिकप बोलेरो गाडीतून गोवंश मांस घेऊन जाताना नाशिक जिल्ह्यातील आरोपीला पोलिसांनी पकडले. हलीम युसुफ शेख (हल्ली राहणार भारत नगर, मूळ रहिवासी कासारा, इगतपुरी, जिल्हा नाशिक) असे आरोपीचे नाव आहे.

पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास बोलेरो गाडीतून सुमारे ९०० किलो गोवंश मांस घेऊन जाणाऱ्या या आरोपीला संगमनेर खुर्द शिवारात नवीन शेतकी पेट्रोल पंपा जवळ शिबलापूर रोड येथे संगमनेर शहर पोलिसांनी छापा टाकून पकडले व त्यास ताब्यात घेतले आहे. हवालदार सुरेश कारभारी घोलवड यांनी फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!