वीटभट्टीवरून अल्पवयीन मुलगी गायब ; संगमनेर शहरातील घटना !
प्रतिनिधी —
संगमनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या एका वीट भट्टीवर काम करणाऱ्या परप्रांतीय व्यक्तीची बहीण सायंकाळी अचानक गायब झाली असली ची घटना घडली आहे.

संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या शहराच्या दक्षिणेकडील एका वीट भट्टीवर परराज्यातून काम करण्यासाठी काही कामगार आले आहेत. या कामगारांमधील एका कामगाराची बहीण देखील त्याच्यासोबत पंधरा दिवसांपूर्वी संगमनेर येथे आली होती.

तक्रारदार भाऊ आणि घरातील काही व्यक्ती वित्भातती वीट भट्टीवर कामासाठी गेले असताना दुपारी तीन वाजता जेवणासाठी घरी परतले. कामावर जाताना घरी असलेली त्यांची बहीण दुपारी तीन वाजता आल्यावर घरात आढळून आले नाही. त्यांनी घरात, गावात, संगमनेर शहरात आणि त्यांच्या गावाकडे चौकशी केली असता त्या ठिकाणी ती आढळून आली नाही.

आपली बहीण घरातून गायब झाली असल्याचे सदर व्यक्तीला आढळून आले. या मुलीचे वय १७ वर्षाचे असून तिला कोणीतरी अज्ञात इसमाने पळून नेले असावे असा त्यांचा संशय आहे. संगमनेर शहर पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल केला आहे.

