करुणा धनंजय मुंडे यांनी केला बदनामीचा गुन्हा दाखल !
प्रतिनिधी —
माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांच्या पत्नी करूणा मुंडे – शर्मा यांनी शुक्रवारी संगमनेर शहर पोलीस ठाणे गाठत संगमनेर तालुक्यातील कोंची येथे राहणारे भारत संभाजी भोसले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

भोसले यांनी सोशल मीडिया द्वारे आपली बदनामी केली असल्याचे सांगत त्यांनी या प्रकरणी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी संगमनेर शहर पोलिसांकडे केली आहे.

यापूर्वी करुणा मुंडे यांची आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हाही भोसले यांच्यावर दाखल आहे. भोसले हे वारंवार सोशल मीडियावर आपल्या विषयी आणि चारित्र्या विषयी वेगवेगळे व्हिडिओ प्रसारित करत असल्याची तक्रार करुणा मुंडे यांनी दिली आहे.

घटनेने संगमनेर मध्ये खळबळ उडाली आहे, गेल्या काही दिवसापूर्वी धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे शर्मा यांनी भोसले यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

नवीन पक्ष काढण्यासाठी भोसले यांनी आपल्याकडून पैसे घेऊन फसवणूक केल्याचा आरोप मुंडे यांनी केला होता. ज्याच्या घरात खायला नाही त्याच्याकडून मी कशाला पैसे घेईल ? त्यांनी माझ्यावर जो पैसे घेतल्याचा आरोप केला आहे तो खोटा असल्याचा दावाही करुणा मुंडे यांनी केला आहे.

दोन्ही बाजूंनी परस्पर फिर्यादी दाखल झाल्यानंतर नक्की हे प्रकरण काय आहे हे आता पोलीस तपासातच निष्पन्न होईल.

