वृत्तपत्र विक्रेता संघातर्फे वाचन दिन साजरा
प्रतिनिधी —
भारताचे माजी राष्ट्रपती व भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्म दिवस वाचन दिन व वृत्तपत्र विक्रेता दिन म्हणून साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर येथील संगमनेर तालुका वृत्तपत्र विक्रेता संघातर्फे आज सकाळी भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी सकाळ वृत्तपत्र समुहाच्या वतीने सर्व विक्रेत्यांना शक्तीवर्धक पावडरचे वाटप करण्यात आले. भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी आपल्या शालेय जीवनात वृत्तपत्र विक्रीचे काम केले होते. त्यातून त्यांना वाचनाची प्रेरणा मिळाली. आणि ते पुढे भारताचे मिसाईल मॅन म्हणून प्रसिद्ध झाले. देशाचे राष्ट्रपती व भारतरत्न म्हणून देश त्यांचा सन्मान करत आहे. आज त्यांची जयंती देशभर साजरी होत आहे. वाचन दिन व वृत्तपत्र विक्रेता दिन म्हणून साजरा केला.

संगमनेर तालुका वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष सतीश आहेर, सचिव संजय आहिरे, ज्येष्ठ सदस्य बाळासाहेब मंडलिक, मन्सूर हुसेन, अण्णासाहेब धुमाळ, अण्णासाहेब बांगर, दिनेश टकले, शिवाजी हासे, संतोष शिंदे, दत्तात्रय शिंदे, रोहित सातपुते, आकाश सातपुते, संजय बेल्हेकर, म्हाळणकर, अशोक थोरात, वाडेकर, तसेच योगेश सोनवणे, यांच्या सह वृत्तपत्र विक्रेते उपस्थित होते.

