संगमनेर बस स्थानकात पोलीस चौकी सुरू करावी ; मनसेची मागणी
प्रतिनिधी —
संगमनेर शहरातील बस स्थानकामध्ये दिवसेंदिवस चोऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. खिसे कापू , पाकीटमार, साखळी चोर असे प्रकार घडत आहेत. तसेच बस स्थानकाच्या आवारात आणि आजूबाजूला लावलेल्या दुचाकी गाड्या चोरण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. त्यामुळे बस स्थानकामध्ये पोलीस चौकी सुरू करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना संगमनेरच्या वतीने करण्यात आली आहे.

संगमनेर शहर पोलीस ठाणे निरीक्षक राजेंद्र भोसले यांना मनसेच्या वतीने या संदर्भात एक निवेदन देण्यात आले.
बसस्थानकात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे दिवसेंदिवस स्थानक परिसरातून दुचाकी गाड्या सोडल्या जातात त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे रोज एक दोन दुचाकी या हमखास चोरीस जात असल्याचे मनसेचे म्हणणे आहे तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जास्त प्रमाणात मुलींना काही टपोरी मुले त्रास देण्याचे काम करत असतात त्या ठिकाणी मुलींची छेड देखील काढली जाते त्यामुळे या सर्व गोष्टींवर आळा बसावा म्हणून या ठिकाणी पोलिसांची कायमस्वरूपी स्वरूपी नितांत गरज आहे

त्यामुळे या ठिकाणी पोलीस चौकी सुरू करावी अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे
जिल्हा उपाध्यक्ष शरद गोर्डे, तालुका अध्यक्ष अशोक शिंदे, शहर अध्यक्ष तुषार ठाकूर, शेतकरी सेनेचे तालुका अध्यक्ष दिपक वर्पे उपाध्यक्ष तुषार बढे, अभिजित घाडगे, संग्राम हासे, महेश उदमले, आकाश भोसले आदी मनसे पदाधिकारी उपस्थित होते.

