वयोश्री योजनेतून वृद्ध नागरिकांचे प्रश्न सुखकर – खासदार डॉ. सुजय विखे पाटील
प्रतिनिधी —
सर्वसामान्य जनतेचा विश्वास संपादन करून गोरगरीब जनतेला प्रत्येक संकटात आधार दिला. राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या माध्यमातून वयोवृद्ध नागरीकांचे प्रश्न सुखकर करणारे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे पहीले पंतप्रधान ठरले असून, ‘सबका साथ सबका विकास’ हेच धोरण केंद्र सरकारचे आहे असे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.

आश्वी बुद्रुक, आश्वी खुर्द, ओझर बुद्रुक आणि ओझर खुर्द येथील लाभर्थ्यांना केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि आधिकरीता मंत्रायलच्या राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या विविध साधन साहीत्याचे वितरण आश्वी बु. करण्यात आले याप्रसंगी खासदार विखे पाटील बोलत होते. यावेळी मांचीहिल शैक्षणिक संकुलाचे संस्थापक शाळीग्राम होडगर, प्रवरा बँकेचे अध्यक्ष अशोक म्हसे, रोहीणी निघुते, एकनाथ नांगरे, संचालक कैलास तांबे, रामभाऊ भुसाळ, मच्छींद्र पावडे, भाऊसाहेब ज-हाड, निवृत्ती सांगळे, भाऊ पाटील गायकवाड, मच्छींद्र थेटे, भाऊसाहेब शेजूळ, प्रकाश उंबरकर, प्रभाकर निघुते, रंभाजी इलग, विजय डेंगळे, ॲड. अनिल भोसले, मंजीत गायकवाड, अशोक जऱ्हाड, आण्णासाहेब जऱ्हाड आदी उपस्थित होते.

वयोवृद्ध नागरीकांचा विचार करणारे नरेंद्र मोदी हे एकमेव पंतप्रधान ठरले आहेत. देशात सर्वसमावेश काम होत असतांना कोव्हीड लसीकरण, मोफत धान्य याबरोबरच जनकल्याणकारी योजनेतून लोकांचा विश्वास संपादन करून केंद्र सरकारने अनेक योजना सुरू केल्या आहेत. शिर्डी मतदार संघामध्ये महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून विकासाचे राजकारण केले जाते. आज राज्यात काम करतांना आपले वेगळेपण सिद्ध करून टक्केवारी विरहीत काम होत असून विखे पाटील यांच्यावर विश्वास ठेऊन जनता देखिल कायम बरोबर राहीली आहे.

वयोश्रीचे साहीत्य आता आपल्याला मिळाले जे कलाकार तुम्हाला सांगत होते की काही मिळणार नाही त्यांना हे साहीत्य दाखवा असाही सल्ला त्यांनी दिला. यावेळी शाळीग्राम होडगर यांनी शिर्डी मतदार संघातील विविध योजनाचा आढावा घेतांनाच विकास कामाबरोबरचं वैयक्तीक योजनेत हा मतदार संघ आघाडीवर असल्याचे सांगितले.

